येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मकर संक्रात उत्सवा निमित्त धडपडमंचचे संस्थापक प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी यंदा १२ फुट उंचीचा आकर्षक डिझाईनचा पतंग तयार केला आहे. सर्वांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत येवला शहरातील मेनरोड वरील उंच ठिकाणी तो लावल्याने रस्त्याने जाणा-या येणा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रभाकर झळके दर सणाला असे वेगवेगळे उपक्रम राबवत येणा-या सणाची आठवण या माध्यमातून करुन देत असतात. सण उत्सवाची परंपरा जपणा-या येवला शहरात मकर संक्रात तीन दिवस मोठ्या उत्सहात साजरी होत असते त्यात ही पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.