येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४२ शाळांच्या वर्गखोल्यांचा दुरुस्तीसाठी तर १२ शाळांमध्ये नवीन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी एकूण ४ कोटी १७ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली असून लवकरच या शाळेच्या दुरुस्ती व बांधकामास सुरुवात होणार असून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
छगन भुजबळ यांचे येवला मतदारसंघातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दुरुस्ती व नवीन इमारतीसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार जिल्हा नियोजन अंतर्गत ४२ शाळांच्या वर्गखोल्यांचा दुरुस्तीसाठी तर १२ शाळांमध्ये नवीन इमारत बांधकामासाठी प्रशाकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी एकूण ४ कोटी १७ लक्ष रुपये निधीस मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन निधी अंतर्गत शाळांच्या विशेष दुरुस्ती या योजनेतून येवला तालुक्यातील सावरगाव, धामोडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १० लक्ष रुपये निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच अनकुटे, सायखेडे, कुसूर म्हसोबावस्ती, घनमाळी वस्ती नगरसूल, पारेगाव, अंदरसूल मन्यारथडी, पिंपळगाव जलाल, नगरसूल सोनवणे वस्ती, जायदरे, चिखलेवाडी नगरसूल शाळेच्या दुरस्तीसाठी प्रत्येकी ५ लक्ष, अंदरसूल मुले ८ लक्ष, आहेरवाडी, एरंडगाव बु. साबरवाडी म्हस्केवस्ती शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी ६ लक्ष, नांदूर ६ लक्ष ४५ हजार, शेवगे २ लक्ष १० हजार, भवानी टेकडी, आगवन वस्ती प्रत्येकी ३ लक्ष ९० हजार, रामवाडी ३ लक्ष ८० हजार, शंकरवाडी २ लक्ष २५ हजार, अंगुलगाव ५ लक्ष ४० हजार, बोंबलेवस्ती, महालखेडा शाळेसाठी प्रत्येकी ३ लक्ष ५० हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.
तसेच महालखेडा १ लक्ष ८५ हजार, लमाणतांडा १ लक्ष ७५ हजार, मातुलठाण १ लक्ष ७५ हजार, अंबुमाळीमळा २ लक्ष ६२ हजार, तांबड धोंडा १ लक्ष ७५ हजार, पाटीलवस्ती ३ लक्ष ५० हजार, न्याहारखेडा बु. ५ लक्ष १० हजार, पन्हाळेसाठे २ लक्ष ८९ हजार, पांझरवाडी ६ लक्ष १५ हजार, रहाडी ४ लक्ष ८५ हजार, नाईकवस्ती ३ लक्ष १० हजार, हनुमाननगर १ लक्ष ८५ हजार, शिवाजीनगर तळवाडे ३ लक्ष २० हजार, ठाणगाव ४ लक्ष ५० हजार, तांदूळवाडी २ लक्ष २५ हजार, वडगाव शाळा दुरस्तीसाठी २ लक्ष ४० हजार रुपये तर निफाड तालुक्यातील विंचूर प्राथमिक शाळेसाठी १० लक्ष, सुभाषनगर शाळेसाठी ८ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. एकूण ४२ शाळांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी २५ निधीस मंजुरी दिली आहे.
येवला तालुक्यातील या १२ शाळांना मिळणार नवीन इमारती….
येवला मतदारसंघात जिल्हा नियोजन निधी अंतर्गत १२ प्राथमिक शाळांच्या इमारतीच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. यामध्ये निफाड तालुक्यातील मरळगोई बु.येवला तालुक्यातील पाटोदा उर्दू व बल्हेगाव,देवदरी, वाघाळे, खरवंडी, अंगुलगाव, भारम,पुरणगाव, देवठाण, मुखेड, नांदूर या नवीन शाळा इमारतीसाठी प्रत्येकी ९.६० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून याप्रमाणे एकूण १२ शाळखोल्यांसाठी १ कोटी ९२ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे
येवला मतदारसंघात १२ अंगणवाडी इमारतींसाठी १ कोटी ३५ लक्ष
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघातील १२ गावांत अंगणवाड्यांच्या इमारतींच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून १ कोटी ३५ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार असून बालकांना अंगणवाडीच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अंगणवाड्या इमारतींच्या कामांमध्ये येवला तालुक्यातील आडगाव चोथवा, पिंपरी, गोपाळवाडी, बाभूळगाव खु. तांदूळवाडी, कानडी तर निफाड तालुक्यातील विंचूर नामदेव मंदिर, विंचूर मारुती मंदिर, खेडलेझुंगे, मरळगोई खुर्द, विठ्ठलवाडी, कोटमगाव गांगुर्डे वस्ती येथे अंगणवाडी इमारतींचा समावेश आहे. या नवीन इमारतीसाठी प्रत्येकी ११.५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून एकूण १२ अंगणवाडी इमारतींसाठी १ कोटी ३५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.