येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील अंदरसुल येथील राजेंद्र जंगम यांच्या घरात चक्क काळवीट घुसल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. भटके कुत्रे मागे लागल्याने भेदरलेल्या काळविटाने थेट जंगम यांच्या घरात धाव घेतली. अखेर वनविभागाच्या पथकाला बोलविण्यात आल्या नंतर दोन तासाच्या प्रयत्नानंतर काळविटाला रेस्क्यू करत नंतर जंगलात सोडून देण्यात आले. दरम्यान घरात घुसलेल्या काळवीटाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.