नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालूक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री. देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवाला आज पासून सुरुवात झाली आहे. पहाटे शासकीय अधिका-यांच्या उपस्थित महापूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. देव मामलेदार हे तत्कालीन प्रांताचे मामलेदार होते. दुष्काळात त्यांनी बागलाणच्या जनतेला ब्रिटीशांच्या विरोधात जाऊन धान्य वाटप केले. एका शासकीय अधिका-याला देवत्व प्राप्त झाले. तेव्हापासून बागलाणवासियांची त्यांच्यावर श्रध्दा असून दरवर्षी त्यांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सव निमित्त दोन वर्षानंतर आरम नदी काठी मोठ्या जत्रा भरते आणि ती पंधरा दिवस सुरु असते.