येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील एरंडगाव येथे गावात पिसाळलेल्या एका कुत्र्याने सहा जणांना चावा घेतल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावातील नागरीकांमध्ये भीती पसरली असून, या सर्वांना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. ज्यांना कमी प्रमाणात पिसाळलेल्या कुत्र्याचा जखमा झाल्या त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.