येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) तालूक्यातील मुखेड येथे पकडण्याच्या नादात एका तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोहित माळी असे या चिमुरड्याच नाव असून पतंगाच्या मोहा पाई तो मुखेडच्या गोई नदीत पडला. मात्र त्याल पोहता येत नसल्याने तो तीन दिवसा पासून घरी परतला नसल्याने त्याचा शोध सुरु असतांना नदीकाठी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. येवला तालूका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह येवला शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी पडलेल्या काठी आणि पतंगामुळेच रोहीत याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.