येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला जवळील कोटमगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी अस त्रिगुणात्मक रुप असलेल्या जगदंबा मातेच्या उत्सवाला सोमवार पासून सुरुवात झाली जगदंबा देवस्थान ट्रस्ट तर्फे १० दिवस चालणा-या नवरात्रोत्सवा साठीची तयारी पुर्ण झाली आहे. दोन वर्षाच्या काळा नंतर यात्रा भरत असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी होणार असल्याने ट्रस्ट तर्फे ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत तर मंदीर परिसरात प्रसादाची दुकाने दोन दिवसापूर्वीच थाटायला सुरुवात झाली. मंदीर २४ तास भाविकांसाठी दर्शनाला खुले राहणार आहे. तर पार्किंग साठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे.