India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

वजन कमी करा आणि १० लाखांचे बक्षिस मिळवा; या कंपनीची कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर

India Darpan by India Darpan
September 26, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी झिरोधाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन फिटनेस चॅलेंज सादर केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक कामांची लांबलचक यादी समाविष्ट आहे. हे आव्हान पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ प्रोत्साहनच मिळणार नाही, तर एका भाग्यवान कर्मचाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीसही दिले जाणार आहे.

झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांच्या मते, या चॅलेंजमध्ये दररोज किमान ३५० कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. कंपनीच्या फिटनेस ट्रॅकर्सवर दैनंदिन ध्येय निश्चित करणे हा एक पर्याय असेल. कामत यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, “झिरोधाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी फिटनेस स्पर्धा आणली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांना दैनंदिन टार्गेट देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणूनही दिला जाईल. शिवाय १० लाख रुपयांचे प्रोत्साहन बक्षिसही आम्ही जाहीर केले आहे.”

कामत यांनी दावा केला की, त्यांची कंपनी कर्मचार्‍यांना घरून काम करताना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. “आपल्यापैकी बहुतेक वर्क फ्रॉम होम करीत आहेत. आपण एक लक्षात घ्यायला हवे की, सतत बसणे हे एक प्रकारचे नवे धूम्रपानच आहे. त्यातून नवनीन समस्या निर्माण होत आहेत. आपण संघटीत काम करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.  आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे कुटुंब सतत पुढे जायला हवे.” झिरोधाच्या संस्थापकाने त्यांच्या या पोस्टसोबत आरोग्य अॅपचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला.

कामत यांनी लिहिले आहे की, “कोविडनंतर माझे वजन वाढले. आता ही ट्रॅकिंग अ‍ॅक्टिव्हिटी झाली आहे. तसेच आहाराबाबत अधिक जागरूक रहायला हवे. हळूहळू रोजचे लक्ष्य १ हजार कॅलरीजपर्यंत वाढवत जायचे आहे.” या वर्षी एप्रिलमध्ये, झिरोधाने आधीच कर्मचार्‍यांना वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले होते. २५ पेक्षा कमी बीएमआय असलेल्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या महिन्याच्या पगाराइतका बोनस मिळाला आहे.

Weight Loss Company Offer Employee Win Prizes


Previous Post

येवल्यातील कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदीर नवरात्रोत्सवासाठी सज्ज (व्हिडिओ)

Next Post

आयएनएस सुनयना सेशेल्समधे दाखल; संयुक्त सागरी बलांच्या सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग

Next Post

आयएनएस सुनयना सेशेल्समधे दाखल; संयुक्त सागरी बलांच्या सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group