येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे किसनराव धनगे तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गट नेते संभाजी पवार यांचे निकटवर्तीय बापू गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या विशेष सभेत सभापती पदासाठी किसनराव धनगे व उपसभापतीपदी बापू गायकवाड यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. आ. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १३ जागा जिंकत बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखले होते.