येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मनमाड-येवला राज्य मार्गावर टोमॅटो घेऊन जाणारी पिकअप गाडी आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात पिकअप चालक याला जबरदस्त मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तांदुळवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघात होताच फाट्यावरील काही नागरिकांनी धाव घेत जखमी ड्रायव्हरला उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.