अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसुल जवळच्या मुळबाई घाटात अपघात होऊन त्यात एक जण ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. येवला येथून नांदगाव कडे जाणा-या ओम्नी कार व दुचाकी यांचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला व्यक्ती जखमी झालाय. कैलास बबन राठोड अस ठार झालेल्या व्यक्तीच नाव असून तो चाळीसगाव तालूक्यातील पिलखोड जवळच्या सेवानगर तांड्यावरील राहणारा आहे. या अपघातात ओम्नीकार मधील दोघे जखमी झाले आहे. हा अपघात होताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना तातडीने येवला येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले.