इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री लता सबरवाल सध्या एका गंभीर आजाराचा सामना करते आहे. लता सबरवाल हिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या आजारपणाची माहिती दिली. तिच्या आजाराचे गांभीर्य पाहता, काळजी न घेतल्यास तिचा आवाज ती कायमस्वरुपी गमावू शकते.
छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवणाऱ्या आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या लता सबरवालने नुकतीच आपल्या चाहत्यांना एक काळजीत टाकणारी बातमी दिली. आपण एका गंभीर आजाराचा सामना करत आहोत. आणि तब्येतीकडे जराही दुर्लक्ष झाले तर अभिनेत्री तिचा आवाज गमावू शकते, असे तिने म्हटले आहे. लताने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या स्टार प्लसवरील मालिकांनी लताला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. मात्र, आजारामुळे कामातून ब्रेक घेत असल्याचे सांगण्यासाठी तिने चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.
मी लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करा
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार तिच्या स्वरयंत्राजवळ गाठ असल्याचे निदान झाले आहे. लताने तिच्या चाहत्यांना विनंती केली की तिला बरे वाटावे याकरता त्यांनी प्रार्थना करावी. मला त्रास होत असल्याने मी नुकतीच घास तज्ज्ञांना भेटले, तेव्हा माझ्या स्वरयंत्राजवळ गाठी असल्याचे निदर्शनास आले आहे. डॉक्टरांनी मला किमान एक आठवडा आवाजाला पूर्णपणे विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. मला सध्या स्टिरॉइड्स देण्यात येत आहेत. बरे होण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. काळजी घेतली नाही तर ही एक गंभीर समस्या आहे, यामुळे माझा आवाज कायमस्वरूपी बदलू शकतो किंवा आवाज गमावण्याची भीतीदेखील आहे.’
टेलिव्हिजवरील हसरा चेहरा म्हणून लताची ओळख आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या दोन्ही मालिकांमध्ये तिने साधी-सोज्वळ अशी भूमिका साकारली आहे. शिवाय शाहिद कपूर-अमृता रावच्या ‘विवाह’ सिनेमात तिने शाहिदच्या वहिनीची भूमिका केली होती, ही भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली. अशा लाडक्या अभिनेत्रीला आवाजासंदर्भातील समस्येचा सामना करावा लागत असल्याने चाहते चिंतेत आहेत. लताला काळजी घेण्याचा सल्ला अनेकजण देत असून तिच्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.
yeh rishta kya kehlata hai fame Actress lataa saberwal Post