नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या दृक-श्राव्य केंद्रातील अधिकारी संतोष साबळे यांनी लिहिलेल्या “इफेक्तीवनेस ऑफ एज्युकेशनल पब्लिक रिलेशन्स इन पब्लिसिटी ऑफ कल्चरल ॲक्टीव्हीटीज” या शोध निबंधाची निवड राष्ट्रीय स्तरावरील शोध ग्रंथात झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया स्टडीज आणि उत्कल युनिव्हर्सिटी, ओडीसा यांच्या संयुक्त विद्यमाने भुबनेश्वर येथे दि. २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यात होणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय मिडिया परिषदेत प्रकाशित होणाऱ्या संशोधन ग्रंथात श्री. साबळे यांनी लिहिलेल्या शोध निबंधाची निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात जनसंपर्काचे महत्व अनन्यसाधारण आहे. संतोष साबळे यांनी आपल्या शोधनिबंधात शैक्षणिक संस्थांमध्ये, सांस्कृतिक घडामोडींचा व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून प्रचार-प्रसार करण्यावर कशाप्रकारे भर दिला जाईल यावर प्रकाश टाकला. तसेच या संशोधनातून परिणामकारकताही अभ्यासण्यात आली. तसेच हा जनसंपर्क वाढविण्यासाठी काय करता येईल, यासाठीच्या उपाय योजनाही या संशोधनातून सुचविण्यात आल्या आहेत.
श्री. साबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी करीत असून, ‘महाराष्ट्रातील विद्यापीठांचा शैक्षणिक जनसंपर्क’ हा त्यांच्या संशोधन अभ्यासाचा मुख्य विषय आहे. श्री. साबळे यांच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. पाटील, कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख, नियोजन अधिकारी डॉ. राम ठाकर, दृक श्राव्य केंद्राचे प्रमुख अभय कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले आहे.
YCMOU Santosh Sable Research Paper Selection