नाशिक (इंडिया दर्पण वृतसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, विद्यापीठाचे राज्यातील तब्बल ६५४ केंद्र बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
महाराष्ट्रातील एक लोक विद्यापीठ म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ओळख निर्माण झाली आहे विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. मुक्त विद्यापीठ १ जुलै १९८८ रोजी सुरू झाले. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम तयार केले, त्यामुळे. अशा प्रकारच्या शिक्षणाच्या संधी या विद्यापीठामुळे उपलब्ध झाल्या.
देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कुसमाग्रज यांनी लिहिले. देशाच्या शिक्षणातील सर्वोच्च संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ( युजीसी ) दोन वर्षांआधीच्या पत्राचा दाखला देत नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यभरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४ केंद्रे बंद केली आहेत. आता ती युजीसीकडून ग्रीन सिंग्नल मिळाल्यानंतरच सुरू हाेतील. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण घेत पदवीधर झाले आहेत. त्यांनी ज्या ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधून पदवी घेतली तेही बंद करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. लाखो विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून शिक्षण घेत पदवीधर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यापैकी एक विद्यार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे हे केंद्र वरिष्ठ महाविद्यालयांमध्येच असावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये सर्व विद्यापीठांना दिले होते. परंतु, कोरोना काळात याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुक्त विद्यापीठाने आता ३२ अभ्यासक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४ केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबई विभागातील ७९, पुणे विभागातील ८६, अमरावती विभागातील १०५, औरंगाबाद विभागातील ५१, नाशिक विभागातील ७६, कोल्हापूर विभागातील ७५, नांदेड विभागातील १०९ केंद्रे बंद करून प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
सध्या देशात मोठय़ा प्रमाणावर खासगी विद्यापीठांचा विस्तार सुरू आहे. या विद्यापीठांना अधिकाधिक विद्यार्थी मिळावे, यासाठी अशा प्रकारची दूरस्थ शिक्षणासाठी असणारी केंद्रे बंद केली जात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून होत आहे. दुर्गम भागात उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये नसल्याने तेथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही मुक्त विद्यापीठाची केंद्रे देण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दोन वर्षांआधीच्या पत्राचा दाखला देत विद्यापीठाने अचानक कनिष्ठ महाविद्यालयांना संलग्नित असलेली केंद्रे बंद करून प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे हे केंद्र वरिष्ठ महाविद्यालयांमध्येच असावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये सर्व विद्यापीठांना दिले होते. परंतु, करोनाकाळात याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुक्त विद्यापीठाने आता ३२ अभ्यासक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४ केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्रावरील विद्यार्थ्यांना महाविद्यालया तील केंद्र स्थापन करून त्यांना पुन्हा शिक्षणात कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना केंद्रे जोडलेली असावीत या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका पत्राचा दाखला देत विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाने आज अडीच लाख विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
पदवी आणि पदव्युत्तरच्या ३२ अभ्यासक्रमांच्या केंद्राबाबत हा निर्णय घेतला आहे. तूर्तास येथील प्रवेश स्थगित केले आहेत. मात्र, विद्यार्थिहितासाठी ‘यूजीसी’कडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या महाविद्यालयात लवकरच केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने दिली. पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम हे वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांकडून शिकवले जाणे आवश्यक आहे. प्राध्यापक असतील त्याच ठिकाणी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असतानाही मुक्त विद्यापीठाने कनिष्ठ महाविद्यालयांत पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम दिले. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेले केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सध्या राज्यात मोठय़ा प्रमाणावर खासगी विद्यापीठांचा विस्तार सुरू आहे. या विद्यापीठांना अधिकाधिक विद्यार्थी मिळावे, यासाठी अशा प्रकारची दुरुस्त शिक्षणासाठी असणारी केंद्रे बंद केली जात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून होत आहे. मुक्त विद्यापीठाची केंद्रे बंद करून खासगी शिक्षणाला बळ देण्याचा हा डाव असल्याचा आरोपही केला जात आहे.तूर्तास या संबंधित केंद्रातील प्रवेश स्थगित केले आहेत. मात्र, विद्यार्थिहितासाठी ‘यूजीसी’कडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या महाविद्यालयात लवकरच केंद्रे सुरू केली जातील, असे सांगण्यात येते.
YCMOU Maharashtra Study Centre’s Closed
Education Open University