India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

यवतमाळमध्ये कोळसा खाणीच्या मॅनेजर लाच घेताना CBIच्या जाळ्यात; तब्बल १ लाख घेताना सापडला

India Darpan by India Darpan
February 8, 2023
in राज्य
0

 

यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) जिल्ह्यातील घोन्सा ओपन कास्ट माइन (ओसीएम), वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल), वणी येथील उपक्षेत्र व्यवस्थापकाला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून लाचखोराला रंगेहाथ पकडले आहे.

सीबीआयला मिळालेल्या तक्रारीनुसार, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणीतून कोळसा उचलण्यासाठी डिलिव्हरी ऑर्डर जारी करण्यासाठी या उपक्षेत्र व्यवस्थापकाने तक्रारदाराकडून 3,23,610/- रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तक्रारदाराच्या कंपनीला घोन्सा (ओसीएम), डब्ल्यूसीएल, वणी उत्तर क्षेत्र, येथून 8,200 मेट्रिक टन कोळसा उचलण्याची परवानगी होती परंतु कंपनी केवळ 4,623 मेट्रिक टन कोळसा उचलू शकली. त्यानंतर संबंधित उपक्षेत्र व्यवस्थापकाने नवीन डिलिव्हरी ऑर्डर जारी करायला नकार दिला आणि त्यांनी तक्रारकर्त्याला पूर्वी दिलेल्या परवानगीसाठी आणि 2,500 मेट्रिक टन कोळशासाठी नवीन वितरण ऑर्डर जारी करण्यासाठी वाटाघाटी अंती 3,19,000/- रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपीच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली असून मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि गुन्ह्याशी संबंधित इतर दस्तऐवज जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला यवतमाळ इथल्या सीबीआयची प्रकरणे हाताळणाऱ्या, केळापूरच्या, विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Yavatmal CBI Raid Manager Trap Bribe Corruption


Previous Post

मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार का? आदित्य ठाकरेंचे आव्हान स्वीकारणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Next Post

जीवघेण्या आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी केंद्र सरकार काय करते आहे? डॉ. भारती पवार म्हणाल्या…

Next Post

जीवघेण्या आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी केंद्र सरकार काय करते आहे? डॉ. भारती पवार म्हणाल्या...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group