मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चीनी स्मार्टफोनमधील Xiaomi या कंपनीने आपल्या Redmi Note 11 सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यामध्ये कंपनीने Redmi Note 11S आणि Redmi Note 11 लॉन्च केले आहेत. यासोबतच, कंपनीने आपले फिटनेस बँड Redmi Smart Band Pro आणि Redmi Smart TVX43 देखील कार्यक्रमात लॉन्च केले आहेत. Xiaomi ने या लॉन्चिंग इव्हेंटचे त्यांच्या YouTube चॅनलवर आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह प्रक्षेपण केले आहे. त्याचबरोबर हे स्मार्टफोन Amazon, MI.com आणि MI Home वरून खरेदी करता येतील. चला जाणून घेऊया या Xiaomi स्मार्टफोन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
Xiaomi ने Redmi Note 11 सिरीजचे दोन्ही स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहेत. Redmi Note 11 च्या 4GB + 64GB ची किंमत 12 हजार 499 रुपये आहे आणि त्याच्या 6GB + 64GB ची किंमत 13 हजार 499 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. Redmi Note 11S 6GB + 64GB ची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. 6GB + 128GB ची किंमत 16 हजार 499 रुपये आणि 8GB + 128GB आणि 17 हजार 499 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Amazon वरुन ऑनलाइन तसेच ऑफलाइन MI Store मधून खरेदी करता येतील. Redmi Band Pro ची किंमत 3 हजार 999 रुपये आहे. सध्या मात्र आपल्याला हा बँड 3 हजार 499 रुपयांमध्ये मिळू शकणार आहे. यासोबतच Redmi TVदेखील लाँच करण्यात आला असून, त्याची किंमत 28 हजार 999 रुपये आहे.
Xiaomi ने Redmi Note 11S मध्ये मागील बाजूस 108MP कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये कंपनीने Samsung HM2 सेंसर वापरला आहे. हा कॅमेरा कमी प्रकाशातही चांगले फोटो काढतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेशिंग दर 90HZ आहे. बॅटरी पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी पॅक आहे जो 33w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
यासोबतच कंपनीने Redmi 11 Note मध्ये 90Hz रिफ्रेशिंग रेटसह AMOLED डिस्प्ले डिस्प्ले देखील दिला आहे. त्याच वेळी, या स्मार्टफोनमध्ये कंपनीने सॅंड्रोप 680 प्रोसेसर दिलेला आहे आणि या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस 50MP चा मजबूत कॅमेरा दिला आहे. तर रेडमीच्या स्मार्ट बॅडमध्ये 110 वर्कआउट मोड दिले आहेत, जे ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि हार्ट रेटिंग मॉनिटरसह इतर फिटनेस वैशिष्ट्यांसह देण्यात आले आहेत. जर आपण Redmi Smart TVX बद्दल बोललो, तर त्याचा आकार 43 इंच आहे आणि तो 4K HDR आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट आणि 30w स्पीकरसह येतो.