बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चुकून तुमच्या खात्यात ११ हजार कोटी रुपये आले तर तुम्ही काय कराल? या तरुणाने बघा काय केलं…

by India Darpan
ऑक्टोबर 12, 2022 | 5:18 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘संधीचे सोने करणे’ अशी एक म्हण मराठीमध्ये आहे, याचा अर्थ एखादी संधी चालून आली तर त्याचा फायदा घेता आला पाहिजे, अर्थात ही संधी प्रत्येकाच्या जीवनात येते असे नाही. परंतु संधी आली तर त्या क्षणाचा फायदा घेतला तर नक्कीच त्याचे सोने होऊ शकते, परंतु हे काही नशिबवान व्यक्तींच्या बाबतीत खरे ठरू शकते, याचा प्रत्यय नुकताच एका व्यक्तीला आला. त्याच्या जीवनात अशीच एक संधी चालून आली अर्थात ही संधी काही काळापूर ती होती हे त्याला माहीत असल्याने त्याने त्याचा फायदा घेण्याची ठरवले, आणि त्या संधीचे अक्षरशः सोने केले म्हणजे आपले पैसे वाढवून घेतले, याला कारण म्हणजे त्याच्या खात्यात अचानक कोट्यावधी रुपये जमा झाले होते. अर्थाचे पैसे चुकीने जमा झाले हे त्याच्या लक्षात आले होते. परंतु त्याने काही क्षणासाठी म्हणजे थोडा काळ त्या पैशांची गुंतवणूक केली आणि त्यातून पैसे कमावले अशीही आयडिया तथा शकल लढविल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

बँकेच्या चुकीमुळे खातेदारांच्या खात्यात पैसे येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे असे होऊ शकते की तुमच्याकडून चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात खाते क्रमांकातील एक अंकही फिरला तर चूक होऊ शकते. अशा वेळी अशी संकटाची परिस्थिती कोणत्याही व्यक्तीसमोर येऊ शकते. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संबंधित बँकांची तात्काळ संपर्क साधणे होय.
मात्र काही वेळा चुकीने एखाद्याच्या खात्यात जास्त पैसे जमा होतात तेव्हा वेगळीच परिस्थिती निर्माण होते. अलीकडेच, बँकेच्या अशाच एका चुकीमुळे अमेरिकेतील एका व्यक्तीला काही काळासाठी जगातील प्रचंड श्रीमंत व्यक्ती बनवले. मात्र, प्रामाणिकपणा दाखवत त्या व्यक्तीने तात्काळ बँकेला आपल्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याची माहिती दिली, आणि ती रक्कम परत केली.

याउलट बँकेच्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियातील एका मुलीच्या खात्यात करोडो रुपये आले. यासंदर्भात बँकेला माहिती देण्याऐवजी तरुणीने त्या पैशातून शॉपिंग केली. तसेच या मुलीने तिच्या खात्यातून १८ कोटींहून अधिक रुपये खर्च केले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात राहणाऱ्या मनीवेल याच्या खात्यात १००डॉलर्सऐवजी सुमारे ७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमा झाले. अर्थात त्या मुलीला कोर्टाने दंड केला आणि रक्कम परत करायला लावली. वरील दोन्ही घटना या परदेशातील असून अलीकडच्या काळात म्हणजे महिन्याभरातच घडलेल्या आहेत, परंतु भारतातही गुजरात राज्यात अशाच प्रकारची घटना घडली मात्र येथे त्या व्यक्तीने परिस्थिती पाहून वेगळेच डोके लढवले म्हणजे रक्कम हडपही केली नाही की, ती प्रामाणिकपणे जमा ही केली परंतु तरी त्याचा प्रचंड मोठा फायदा झाला.

अहमदाबाद येथील एका व्यक्तीच्या खात्यात चुकून सुमारे ११,६०० कोटी रुपये जमा झाले. खरे म्हणजे काही तासानंतर हे खात्यातून पैसे परतही गेले. मात्र, तेवढ्या वेळात त्याने २ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ५ लाख रुपये कमावले. सागर (मर्चंट ) नावाचे एक शेअर व्यावसायिक असून दोन महिन्यापूर्वी सकाळी ते शेअर ट्रेडिंगसाठी बसले. तेव्हा अचानक त्यांच्या खात्यात ११,६७७ कोटी रुपये जमा झाले. खरे म्हणजे आपल्या खात्यात एवढे पैसे नसताना ही प्रचंड रक्कम आली कुठून याचा याचे त्यांना आश्चर्य वाटले, मात्र त्यांनी खूप विचार केला, हे पैसे थोड्याच वेळात परत जातील, हे सगर यांना माहीत होते. त्यांनी युक्ती केली आणि झटपट सुमारे २ कोटी रुपये वेगवेगळ्या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवून ट्रेडिंग केले. त्याआधीची त्यांची सर्वाधिक मोठी गुंतवणूक अवघी २५ हजार रुपयांची होती. या ट्रेडिंगमधून त्यांना साडेपाच लाख रुपयांचा फायदा झाला. त्यानंतर थोड्याच वेळात सर्व रक्कम आली तशी परत गेली. पण आलेली रक्कम ही संधीचे सोने करून गेली, अशी आता त्या परिसरात चर्चा सुरू आहे.

Wrongly Transfer 11 Thousand Crore Rupees in Bank Account

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोलापूरमध्ये बदलतेय पीक पद्धती बदलतेय; याच्या लागवडीकडे कल

Next Post

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत मोठा बदल; १ ऑक्टोबरपासून लागू

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत मोठा बदल; १ ऑक्टोबरपासून लागू

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011