शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जगातील सर्वात मोठे मंदिर… २३ एकर परिसर… सोन्याच्या पायऱ्या… भगवान विष्णूंची विशाल मूर्ती… १०० स्तंभांची अग्रशाला…

by Gautam Sancheti
मार्च 19, 2023 | 9:43 pm
in इतर
0
FrjCKafWcAIuPNk

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातील सर्वांत मोठे मंदिर – भाग १६ 
कांचीपुरमचे वरदराज पेरूमल मंदिर
(क्षेत्रफळ ८१,००० स्क्वेअर फुट)

‘इंडिया दर्पण’च्या जगातील सर्वांत मोठे मंदिर या विशेष मालिकेत आज आपण कांचीपुरमचे विख्यात वरदराज पेरूमल मंदिराचा परिचय करुन घेणार आहोत २३ एकर भूभागावर वसलेले हे मंदिर म्हणजे भगवान विष्णुच्या मंदिरांची नगरीच आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

कांचीपुरम हे मंदिराचंच नगर आहे. येथे लोकांच्या घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे. कांचीपुरम येथे केवळ कांची कामाक्षी हेच एकमेव क्षेत्र नाही तर कांची येथे शिव कांची आणि विष्णु कांची ही देखील तीर्थक्षेत्रं प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहेत. यामुळे हिंदू धर्मातील शाक्त, शिव आणि वैष्णव उपासक यांच्यासाठी कांचीपुरम अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. आज आपण ज्या वरदराज पेरूमल मंदिराची माहिती घेणार आहोत ते मंदिर विष्णु कांची भागात येते. या भागात विष्णुची असंख्य मंदिरं आहेत. यातील प्रमुख मंदिर आहे ते म्हणजे वरदराज पेरूमल मंदिर!

मंदिराचे प्रवेशद्वार: राज गोपुरम
विष्णु कांचीचे प्रमुख केंद्र बिंदु आहे वरदराज पेरूमल मंदिर या मंदिराला देवराजस्वामी मंदिर देखील म्हणतात. २३ एकर भू-भागावर पसरलेले हे मंदिर केवळ एकच मंदिर नाही तर अनेक मंदिरांचा समूह आहे. या मंदिरासोबतच अनेक स्तंभाचे मंडप,कक्ष आणि अनेक कुंड या परिसरात आहेत. कांचीपुरम मधील प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक मंदिरामागे पौराणिक कथा आहेत.

राज गोपुरम
दक्षिण भारतीय मंदिर म्हटले की तेथे सर्वप्रथम लक्ष्य वेधून घेते ते मंदिराचे गोपुरम म्हणजेच मंदिराचे प्रवेशद्वार. वरदराज पेरूमल मंदिराचाही याला अपवाद नाही. या मंदिर परिसरात येताच येथील सात मजली दगडी कलाकुसरयुक्त उंच गोपुर आपले लक्ष्य वेधून घेते. या गोपुराला राज गोपुरम असे म्हणतात. राज गोपुरम मधून आत प्रवेश करताच चार स्तंभावर उभा असलेला एक लहानसा दगडी मंडप दिसतो.या मंडपाजवळून मंदिराचा उंच ध्वजस्तंभ नजरेस पडतो.

https://twitter.com/BharatTemples_/status/1265118587070459904?s=20

१०० स्तंभांची अग्रशाला
राज गोपुरमच्या डाव्या बाजूला वरदराज पेरूमल मंदिरातील प्रसिद्ध १०० स्तंभांची अग्रशाला आहे. १०० स्तंभांच्या अग्रशालाचे महत्व म्हणजे येथील प्रत्येक स्तंभ आपली स्वतंत्र कहानी कथन करतो.
१०० स्तंभांची अग्रशाला– अश्व सेना
१०० स्तंभांची ही अग्रशाला म्हणजे एक विवाह मंडप आहे. येथे मध्यभागी चार स्तंभावर एक विवाहमंडप उभारलेला आहे. उरलेले ९६ खांब ८ श्रुंखलाच्या १२ रांगामध्ये विभागलेले आहेत. मधल्या दुहेरी स्तंभावर घोड्यावर आरूढ़ झालेली सेना येथे कोरलेली आहे. बाहेरच्या स्तंभावर मंगल चिन्ह कोरलेली आहेत.

दगडी साखळी – वास्तुशिल्प कलेचे उत्कृष्ट उदहारण
अग्रशाळेच्या बाहेर एका उंचवटयावर दगड कोरुन एक साखळी लटकलेली आहे. ही दगडी साखळी पाहून प्रत्येक व्यक्ती चकित होते मात्र या दगडी साखळीचे येथे काय प्रयोजन आहे ते लक्षांत येत नाही.
या अग्रशाळेच्या संरक्षणच्या दृष्टीने बाहेरील बाजूंनी लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. परंतु हे करतांना अग्रशाळेच्या सौंदर्याकड़े दुर्लक्ष झाले आहे. ही अग्रशाळा सकाळी नऊ वाजता उघडते. ही अग्रशाळा पाहण्यासाठी ५ रूपये प्रवेश फी ठेवलेली आहे.

https://twitter.com/KamakshiTemple/status/1633871306683990019?s=20

अनंतसरस – कुण्डातील जलमग्न मंदिर
कांचीपुरमच्या वरदराज पेरूमल मंदिरातील १०० स्तंभांच्या अग्रशाळेमागे एक विशाल जलकुंड आहे. या जलकुंडाच्या मध्यभागी एक लहानसे मंदिर आहे.या मंदिरात जाण्यासाठी चारी बाजूंनी पायर्या आहेत. कुंडाच्या चारी बाजूंना भगवान विष्णुंची अनेक लहान लहान मंदिरं आहेत.यातील एका कोपर्यात मुख्य मंदिर आहे.

अनंत सरस कुंड
या कुंडाला अनंतसरस असे म्हणतात. या कुंडाचे विशेष म्हणजे या कुंडात एक गुप्त मंदिर आहे असे म्हणतात, या मंदिरातील भगवान विष्णुची मूर्ती अंजिराच्या लाकड़ा पासून तयार करण्यात आली होती. कालांतराने ही मूर्ती काढून तिच्या जागी धातूची मूर्ती बसविण्यात आली. त्यावेळी लाकडी मूर्ती एका चांदीच्या पेटीत ठेवून ती पेटी याच कुंडात विसर्जित करण्यात आली. दर ४० वर्षांनी ही पेटी उघडून त्यातील मुर्तीची पूजा केली जाते. जुलाई २०१९ मध्ये या लाकडी मुर्तीची अशी पूजा करण्यात आली होती.
मुख्य मंदिरातील दर्शनानंतर कुंडाच्या भोवती असलेल्या मंदिरांचे दर्शन घेतात. येथे वेणुगोपाल,वराह, रंगनाथ, नरसिंह आदि विष्णु अवताराची मंदिर आहेत. विष्णुच्या सहस्त्रनामा नुसार ही अनेक मंदिरं येथे पहायला मिळतात. एक बाजूला १०० स्तंभांची अग्र शाला आहे. त्याच्या बाजूला अनेक नागशिला ठेवलेल्या आहेत त्यावर हळद वाहण्याची प्रथा आहे.

https://twitter.com/Ashwinsampathk/status/1326387720260882433?s=20

उग्र नरसिंह मंदिर
ध्वजस्तंभ आणि त्याच्या समोर असलेले गोपुरम पार केले की एक छोटेखानी परंतु आकर्षक मंदिर दिसते.हे उग्र नृसिंह मंदिर आहे. भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारातील मूर्ती येथे स्थापन केलेली आहे.
पेरुन्देवी थेयर मंदिर
नरसिंह मंदिराच्या उजव्या बाजूला एक विशाल मंदिर आहे. मंदिर कलाकुसर युक्त आहे हे मंदिर पेरुन्देवीचे मंदिर आहे असे सांगतात. पेरुन्देवी हा लक्ष्मीचाच अवतार असल्याचे येथील पुजर्याने सांगितले. या मंदिराचे गर्भगृह लहान आहे मात्र मंदिरा समोर अनेक स्तंभांची खूप मोठी अग्रशाला आहे.

पेरुन्देवी थेयर मंदिराचे कोरीव स्तम्भ
अग्रशालेच्या मध्यभागी एक चार खांबी मंडप आहे,या मंडपाचे चारी खांब निळया रंगात रंगविलेले आहेत. एक हजार वर्षांनंतर देखील या रंगाची झळाली कमी झालेली नाही.यावरून नवीन असतांना हे मंदिर किती सुंदर दिसत असेल याची कल्पना येते. या मंदिरात चार खांबावर आधारित छोटे छोटे मंडप आहेत.हा म्हणजे इथला पार किंवा चावडी म्हणता येईल. येथे विष्णु कांचीतील नागरिक सकाळी व सायंकाली जमुन गप्पा मारत असत असे म्हणतात.

https://twitter.com/tntourismoffcl/status/1632737602574090243?s=20

वरदराज पेरूमलचे मुख्य मंदिर
लाल आणि सफेत रंगांनी सजविलेले काही चबूतरे पार करून एका उंच मंचावर एक लहानसे द्वार दिसते हे वरदराज पेरूमलमंदिराचे एकमेव प्रवेशद्वार आहे.
मंदिराच्या सोनेरी पायऱ्या
वरदराज पेरूमल मंदिर हस्तगिरी नावाच्या लहानशा टेकडीवर बांधलेले आहे. मंदिराच्या भव्यतेमुळे ते लक्षांत येत नाही मुख्य मंदिराचा गाभारा मात्र खूप उंच आहे ते पाहून आश्चर्य वाटते.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी सोनेरी रंगाच्या अनेक पायर्या आहेत. येथे दगडी पायर्यांना सोनेरी धातुंचा मुलामा दिलेला आहे. या पायर्यांवर नाजुक कलाकुसर केलेली आहे. धातूची ही चमकदार कलाकुसर दिसते छान परंतु पायर्याची सोंडेच्या आकाराची टोकदार नक्षी पायांना चांगलीच टोचते.त्यामुले भाविक शक्य तो झटपट पायर्या चढून वर जातात.

आकषर्क भित्तीचित्र
मंदिरात गेल्यावर भिंतीवरील भव्य रंगीत पेंटिंग लक्ष्य वेधून घेते. येथे भगवान विष्णुच्या विविध अवतारातील प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. भगवान विष्णु शेषनागावर पहुडलेले असून माता लक्ष्मी त्यांचे चरण कमलापाशी बसलेली आहे. एका चित्रांत शंख,चक्र,गदा आणि पद्मधारी चार भुजाधारी भगवान विष्णुंचे भव्य रूप दिसते.भगवान विष्णुंचे अनेक भक्त देखील या चित्रांत पहायला मिळतात.भगवान विष्णुंचा रंगीबेरंगी दरबारच या मंदिरातील भिंतीवर पहायला मिळतो. या रंगीत चित्रांची अवस्था मात्र दयनीय झालेली आहे. अनेक चित्रांचे रंग उडाले आहेत त्याची दागदुजी करने आवश्यक आहे. एवढे श्रीमंत देवस्थान असून मंदिराच्या मुख्य गाभार्यातील जुन्या चित्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते.

https://twitter.com/PiyuNair/status/1458782629222776844?s=20

भगवान विष्णुंची विशाल मूर्ती
वरदराज पेरूमल मंदिरातील भगवान विष्णुची मूर्ती अतिशय रेखीव देखणी आणि भव्य आहे. आज एक हजार वर्षांपासून करोड़ो नव्हे तर अब्जावधी भाविकांनी या मूर्तीचे दर्शन घेतले असेल. काळावरही मात करणारे हे मंदिर आणि इथले भगवान विष्णु पाहून आपले क्षुद्रत्व लक्षांत येते. भाविक भगवान विष्णुपुढे नतमस्तक होतात. येथे भगवान विष्णुंना तुलसीहार अर्पण केले जातात.

आकषर्क छिपकली
वरदराज पेरूमल मंदिर इथल्या छिपकली म्हणजे पालींच्या कोरीव रंगीत शिल्पचित्रासाठी प्रसिद्ध.गर्भगृहाच्या बाहेर आल्यावर दोन रुपयांचे तिकिट काढून या पाली पाहता येतात तसेच त्यांना हा लावणे भाग्याचे समजले जाते. गर्भगृहाच्या छतावर अनेक मोठ मोठ्या पाली कोरलेल्या आहेत तसेच त्यांना आकर्षक रंग देखील दिलेले आहेत. येथेही भिंती वर चारी बाजूंना रंगीत चित्रं काढलेली आहेत.

सर्वांत उंच गोपुरम
मंदिर परिसरांत दोन गोपुरं आहेत. त्यातले एक गोपुर गावाच्या विरुद्ध दिशेला असल्याने बहुदा वापरत नाहीत. हे गोपुर सर्वांत उंच आहे. त्यातून येण्या-जाण्यासाठी लहानसा दरवाजा देखील आहे.

https://twitter.com/tntourismoffcl/status/1034699466761109505?s=20

मंदिरातील प्रमुख उत्सव
वरदराज पेरूमल मंदिरात कृष्ण जन्माष्ठमीच्या सुमारास प्रत्येक विष्णुमंदिरात उत्सव आयोजित केले जातात. यावेळी भगवान विष्णुच्या उत्सव मुर्तीची पालखीतुन मिरवणुक काढली जाते.
पालखीचा दाडा भरपूर लांब असतो. अनेक पुजारी आणि भाविक पुरुष ही पालखी खांद्यावर घेउन चालतात. पालखीत शेष नागाच्या छायेत भगवान विष्णुंची अतिशय मनोहर मूर्ती ठेवलेली असते. पालखीच्या वर वरदराज पेरूमल मंदिरातील सुप्रसिद्ध लाल आणि सफेद रंगातील गोल छत्री भगवंतावर छाया धरतात. पालखी प्रदक्षिणा होतांना जणू भगवान विष्णु आपल्या विष्णु कांचीपुरम नगराची ख्यालीखुशाली पहायला निघाले असे वाटते.
एरवी शांत असलेला मंदिर परिसर उत्सवी वातावरणामुले चैतन्यमय होतो. आणि आपण जर प्रथमच येथे आलो तर ही मंदिर भेट कायमस्वरूपी लक्षांत रहते.

लेखक – विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple Kanchipuram Vishnu Temple by Vijay Golesar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट… १५०० अधिक कलाकारांकडून गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण.. (व्हिडिओ)

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – वैतागलेला पती आत्महत्या करायला जातो

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - वैतागलेला पती आत्महत्या करायला जातो

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011