India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट… १५०० अधिक कलाकारांकडून गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण.. (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 19, 2023
in साहित्य व संस्कृती
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण त्रयोदशी (प्रदोष) शके १९४४ अर्थात १९ मार्च २०२३, रविवार सायं. ६.०० वा. तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रम ने गोदाघाट संगीताच्या स्वरांनी फुलला होता निमित्त होते ते भव्य दिव्य अशा ‘अंतर्नाद’, गायन-वादन- नृत्याचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमाचे.

नाशिक शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील १५०० कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिध्द भरतनाट्यम नृत्यांगणा आणि गुरु डॉ. सुचिताताई भिडे – चापेकर उपस्थित होत्या त्याचबरोबर खासदार हेमंत गोडसे, नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे, नाशिक मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,

उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अशोका ग्रुप चे अशोक कटारिया, श्री श्री श्री १००८ कपिकूल गुरुपीठम च्या वेणू दीदी, तसेच नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे,
नाशिक टायर्स चे तुषार सेजपाल, इच्छामणी केटरर्सचे अनिकेत गाढवे, गजानन केटरर्सचे पंकज पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडवा पटांगण गोदाघाट येथे संपन्न झाला.

आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरवात सहभागी सर्व गुरुजनांच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरमने झाली, त्यानंतर कस्तुरी तिलकम हि कृष्ण वंदना सादर केली, मग सहभागी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना हि गायन, बासरी, कथ्थक व भरतनाट्यम भावमुद्रेतून प्रस्तुत करण्यात आली. कार्यक्रमात पुढे राग दुर्गा सादर झाला, पुढे कथ्थकच्या मुलींनी जय जगदीश्वरी माता सरस्वती हि नांदी प्रस्तुत केली व महागपतीम मनसा स्मरामी यावर भरतनाट्यम च्या मुलींनी सादरीकरण केले. पुढे यमन राग बासरी व तबल्याद्वारे सादर करण्यात आला. त्यानंतर राग तिलक कामोद – आलाप बंदिश, छोटा ख्याल – ताल त्रिताल हा प्रस्तुत करण्यात आला. कार्यक्रमात पुढे मालकंस राग आलाप व तानासहित मुलांनी सादर केला, देस राग, तराना – बंदिश गायन प्रस्तुत करण्यात आले. विद्यार्थ्यानी पुढे कथ्थक तबला जुगलबंदी सादर केले. मग कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ठुमक चलत रामचंद्र, मग वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, त्यानंतर कानडा राजा पंढरीचा आणि शेवट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचित जयोस्तुते या गीताने करण्यात आला.

या अंतर्नाद कार्यक्रमात शहरातील तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रम यांचे अनेक दिग्गज व प्रतिष्ठित गुरुकुल यात सहभागी झाले होते.
अंतर्नाद या कार्यक्रमाचे संगीत समन्वयन हे नितीन वारे आणि नितीन पवार यांनी केले तर अंतर्नाद कार्यक्रमाचे सर्व नियोजन अंतर्नाद प्रमुख निनाद पंचाक्षरी व सहप्रमुख केतकी चंद्रात्रे यांनी पहिले.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले.
दरम्यान शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत, महेश महांकाळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

नाशिक अंतर्नाद
दिनांक: १९ /०३ /२०२३
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट
१५०० अधिक कलाकारांनी केले हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण pic.twitter.com/aV5h9y6uBp

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 19, 2023

अंतर्नाद कार्यक्रमात नाशिक शहरातील सहभागी संस्था व त्यांच्या गुरूंची नावे पुढीलप्रमाणे :

अनुक्र…. गुरूंचे नाव….गुरुकुलाचे नाव…विभाग
१
संजीवनी कुलकर्णी
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
२
डॉ. सुमुखी अथणी
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
३
कीर्ती भवाळकर
नृत्यांगण कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
४
कीर्ती शुक्ल
नृत्यानंद कथ्थक डान्स अकॅडमी
कथ्थक
५
शिल्पा सुगंधी
रिधम डान्स अँड म्युझिक अकॅडमी
कथ्थक
६
सायली मोहाडकर
नृत्यांगण कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
७
वृषाली कोकाटे
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
८
दीपा बक्षी
अंतरंग कथ्थक संस्था
कथ्थक
९
तृषाली पाठक
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
१०
सानवी कुलकर्णी
नीलग्रीव कला केंद्र
कथ्थक

११
ऋतुजा चंद्रात्रे
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
१२
हरविशा तांबट
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
१३
श्रावणी मुंगी
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
१४
सोनाली बन्नापुरे
उन्नती कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
१५
निवेदिता तांबे
सम- काल अकॅडमी
कथ्थक
१६
कल्याणी कुलकर्णी
कलानंद कथ्थक नृत्य संस्था
कथ्थक
१७
गौरी औरंगाबादकर
आकार कल्चरल अकॅडमी
कथ्थक
१८
माया तोडकर
वसंत कला मंदिर
कथ्थक
१९
सोनाली करंदीकर
नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी
भरतनाट्यम
२०
शिल्पा देशमुख
सृजननाद
भरतनाट्यम

२१
सोनाली शहा
नृत्यांगण डान्स अकॅडमी
भरतनाट्यम
२२
कनकलता साकोरीकर
कनकलता नृत्यालय
भरतनाट्यम
२३
सारिका खांडबहाले
नृत्यांजली कला अकॅडमी
भरतनाट्यम
२४
पल्लवी जन्नावार
नृत्यवंदना पल्लवी’स डान्स अकॅडमी
भरतनाट्यम
२५
प्रिया दाते
नृत्यप्रिया अकॅडमी
भरतनाट्यम
२६
प्राजक्ता भट
दुर्वांकुर नृत्य निकेतन
भरतनाट्यम
२७
अर्चना बढे
अर्चना नृत्य कला निकेतन
भरतनाट्यम
२८
नेहा पानसरे
कलाप्रणाम नृत्य संस्था
भरतनाट्यम
२९
अनिरुद्ध बुधर
मूज़ोफ्रेक
ड्रम
३०
अनिल कुटे
बासरी प्रशिक्षण वर्ग
बासरी

३१
सुहास वैद्य
बासरी प्रशिक्षण वर्ग
बासरी
३२
नितीन वारे
आदिताल तबला अकॅडमी
तबला
३३
नितीन पवार
पवार तबला अकॅडमी
तबला
३४
गिरीश पांडे
स्वर वसंत कला अकॅडमी
तबला
३५
जयेश कुलकर्णी
आदिताल तबला अकॅडमी
तबला
३६
रसिक कुलकर्णी
आदिताल तबला अकॅडमी
तबला
३७
गौरव तांबे
सम- काल तबला अकॅडमी
तबला
३८
रूपक मैंद
पवार तबला अकॅडमी
तबला
३९
कमलाकर जोशी
गांधर्व महाविद्यलाय
तबला
४०
दिगंबर सोनावणे
रागिणी कला मंदिर
तबला

४१
कुणाल काळे
मूज़ोफ्रेक
तबला
४२
अथर्व वारे
आदिताल तबला अकॅडमी
तबला
४३
अद्वय पवार
पवार तबला अकॅडमी
तबला
४४
आशुतोष इप्पर
पवार तबला अकॅडमी
तबला
४५
सौरभ ठकार
आदिताल तबला अकॅडमी
तबला
४६
संकेत फुलतानकर
आदिताल तबला अकॅडमी
तबला
४७
जितेंद्र धर्माधिकारी
गांधर्व महाविद्यलाय
तबला
४८
सुजित काळे
पवार तबला अकॅडमी
तबला
४९
नंदकुमार देशपांडे
सरगम म्युझिक अकॅडेमि
सुगम संगीत
५०
विवेक केळकर
सरगम सुगम संगीत विद्यालय
सुगम संगीत

५१
भैरवी चित्राव
स्वरसाधना संगीत विद्यालय
सुगम संगीत
५२
यामिनी कुलकर्णी
पंचम संगीत क्लास
सुगम संगीत
५३
प्रीती आचार्य
विद्या विनय गुरुकुल
सुगम संगीत
५४
मुक्त धारणकर
ओंकार संगीत विद्यालय
सुगम संगीत
५५
अनुराधा जोशी
हेरंभ संगीत विद्यालय
सुगम संगीत
५६
माधव दसक्कर
दसक्कर क्लास्सेस
शास्त्रीय संगीत
५७
ज्ञानेश्वर कासार
नादसाधना संगीत निकेतन
शास्त्रीय संगीत
५८
पुष्कराज भागवत
स्वरायण संगीत अकॅडमी
शास्त्रीय संगीत
५९
अर्चना अरगडे
स्वर सुगंध गायन क्लासेस
शास्त्रीय संगीत
६०
जाई सराफ
स्वरदीप संगीत विद्यालय
शास्त्रीय संगीत

६१
शिप्रा बिडवाई
नादब्रह्म म्युझिक अकॅडेमि
शास्त्रीय संगीत
६२
प्रज्ञा वनीकर
श्रीराम संगीत विद्यालय
शास्त्रीय संगीत
६३
जयश्री शिंदे
वेदांत म्युझिकल अकॅडमी
शास्त्रीय संगीत
६४
स्मिता जोशी
स्वरानंद म्युझिकल अकॅडमी
शास्त्रीय संगीत
६५
सुवर्ण बडगुजर
स्वराधना संगीत क्लास्सेस
शास्त्रीय संगीत
६६
मेघना येवणकर
स्वरा संगीत विद्यालय
शास्त्रीय संगीत
६७
अनघा माळी
नुपूर म्युझिक क्लासेस
शास्त्रीय संगीत
६८
गौरी देशपांडे
ब्रह्मचैतन्य म्युझिक अकॅडमी
शास्त्रीय संगीत
६९
प्रांजली बिरारी
प्रांजली बिरारी क्लासेस
शास्त्रीय संगीत
७०
मनीषा इनामदार
स्वरनिर्झर क्लासेस
शास्त्रीय संगीत

७१
स्मिता पाटणकर
स्मितस्वर संगीत अकॅडमी
शास्त्रीय संगीत

कार्यक्रमात उद्या:
‘महारांगोळी’: सोमवार २० मार्च २०२३ रोजी ‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून “महारांगोळी” (२५००० स्वेअर फुट रांगोळी, सकाळी ६ वाजेपासून). नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून ५०० पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन सुमारे २५००० चौरस फुट रांगोळी साकारतात त्यासाठी त्याचे रांगोळीचे कौशल विकास प्रशिक्षण राबविले जाते. या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उउपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.
Nashik Godaghat Classical Music 1500 Performances New Year Celebration


Previous Post

राहुल गांधींची खासदारकी जाणार? भाजप नेमका कोणता डाव टाकणार? हे शक्य आहे का? इतिहास काय सांगतो?

Next Post

जगातील सर्वात मोठे मंदिर… २३ एकर परिसर… सोन्याच्या पायऱ्या… भगवान विष्णूंची विशाल मूर्ती… १०० स्तंभांची अग्रशाला…

Next Post

जगातील सर्वात मोठे मंदिर... २३ एकर परिसर... सोन्याच्या पायऱ्या... भगवान विष्णूंची विशाल मूर्ती... १०० स्तंभांची अग्रशाला...

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group