शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कात्यायिनी देवीचे हे आहे जगातील सर्वात मोठे मंदिर… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये… जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

by Gautam Sancheti
जानेवारी 1, 2023 | 9:43 pm
in इतर
0
EhxhpJoU8AA6PBm

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जगातले सर्वांत मोठे मंदिर
भाग ५
दिल्लीच्या छत्तरपूरचे कात्यायिनी देवी मंदिर!
(क्षेत्रफळ २, ८०, ००० स्क्वेअर मीटर)

‘इंडिया दर्पण’च्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेले दोन आठवडे दिल्लीत मुक्कामी असल्यामुळे जगातील सर्वांत मोठी मंदिरं या विशेष लेखामालेत मागच्या सोमवारी दिल्लीतील ‘अक्षरधाम’ मंदिराची माहिती दिली आणि कालच दिल्लीतील दुसरे सर्वांत मोठे मंदिर पाहून आल्याने ‘इंडिया दर्पण’च्या जगातील सर्वांत मोठे मंदिर या विशेष लेखामालेत आज आपण दिल्लीतील ‘छत्तरपुर’ या मंदिराची माहिती घेणार आहोत.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

छत्तरपूर येथील सर्व मंदिरं संगमरमरी दगड वापरून तयार करण्यात आली आहेत. या परिसरांत विविध देवी देवतांची २०-२२ मंदिरं आहेत. सर्व मंदिरं अतिशय सुंदर कलाकुसर युक्त आहेत. संपूर्ण परिसर पहायला किमान दोन ते अडीच तास वेळ लागतो. २००७ पर्यंत हे दिल्लीतले आणि देशांतले सर्वांत मोठे देवस्थान म्हणून प्रसिद्ध होते. २००७ साली १०१ एकर जागेवर अक्षरधाम मंदिराचे लोकार्पण झाल्यावर तर या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली.

दिल्लीत इ.स. २००७ ला स्वामीनारायण परिवराचे अक्षरधाम मंदिर तयार होण्यापूर्वी छत्तरपुर येथील आद्य कात्यायिनी देवीचे मंदिर देशातले सर्वांत मोठे मंदिर गणले जात होते. ७० एकर म्हणजेच २ लाख ८० हजार चौरस मीटर जागेवर हे मंदिर बांधलेले आहे. त्यानंतर २००७ साली दिल्लीत अक्षरधाम मंदिराचे लोकार्पण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हस्ते करण्यात आले. अक्षरधाम मंदिर १०१ एकर जागेवर बांधण्यातआलेले असल्याने देशातील सर्वांत मोठ्या मंदिराचा मान अक्षरधाम मंदिराला मिळाला. विशेष म्हणजे अक्षरधाम मंदिराची जगातले सर्वाधिक मोठे हिंदू मंदिर म्हणून २६ डिसेंबर २००७ मध्ये नोंद देखील करण्यात आली आहे.

वसारा आर्किटेक्चर
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरापेक्षा सीनियर असलेले आद्य कात्यायिनी देवीचे छत्तरपुर चे मंदिर बाबा संत नागपालजी यांनी १९७४ साली बांधले. ७० एकर जागेवर बांधलेले हे संपूर्ण मंदिर आणि त्याचा परिसर मार्बल पासून तयार करण्यात आलेला आहे.मंदिराच्या सर्व भिंती वसारा आर्किटेक्चर पद्धतीच्या जाळीदार असून सर्वत्र अतिशय मनोवेधक नक्षीदार कलाकुसरीने सजविलेल्या आहेत..
विशाल लॉन्स आणि बहरलेल्या बागा
दक्षिण दिल्लीत कुतुबमीनार पासून ४ किमी अंतरावर गुरगाव -महरौली महामार्गावर छत्तरपुरयेथे हे मंदिर आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक वास्तुंप्रमाणेच छत्तरपुर मंदिराला अतिशय विशाल लॉन्स आणि सुंदर पाना फुलांनी बहरलेल्या बागा आहेत. या सर्व लान्स आणि बागा विशेष काळजी घेउन विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुले येथील मंदिराप्रमाणेच येथील बगीचे देखील पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षण केंद्र ठरली आहेत.

कात्यायिनी देवीचे जगात मोठे मंदिर!
भारतात देवींची अनेक मंदिरं आहेत. यात वैष्णोदेवी, कामाक्षी देवी, कोलकात्याची कालिका, कन्याकुमारी सारखी अनेक देवी मंदिरं जगप्रसिद्ध आहेत. पण या सर्वांत मोठे आहे ते दिल्ली येथील आद्य कात्यायिनी देवी मंदिर! सुप्रसिद्ध नऊ दुर्गा मधली ही सहाव्या क्रमांकाची देवी, नवरात्रांत तर येथे लाखो देवीभक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. या मंदिराचा परिसर एवढा विशाल आणि वेल डेव्हलप केलेला आहे की लाखो पर्यटक येथे आले तरी त्या सर्वांची व्यवस्था येथे ठेवली जाते.

अशी दिसते कात्यायिनी देवी
कात्यायिनी देवी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे. ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.

कात्यायणी देवीचे पूजन
दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.

दर्शन रांगा
दिल्ली येथील कात्यायिनी देवीचा गाभारा अतिशय आकर्षक आणि प्रशस्त आहे. मंदिरांत दररोज हजारो भक्त दर्शनार्थ येतात. नवरात्रोत्सवात येथे लाखांनी भाविक जमतात त्यामुळे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर्शन रांगा किंवा बारीची व्यवस्था केलेली आहे. स्टीलच्या चकचकीत रेलिंग मधून भाविक हळूहळूपुढे सरकतात. मंदिर परिसरांत सर्वत्र मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

देवीचे आलिशान शयनकक्ष आणि सौंदर्य प्रसाधन कक्ष
आपल्या तुळजा भवानी प्रमाणेच या देवीसाठी स्वतंत्र शयनकक्ष आणि सौंदर्य प्रसाधन कक्ष आहेत. देवीचे हे शयनकक्ष आणि सौंदर्य प्रसाधन कक्ष गाभार्या जवळच आहेत. ते देखील सोने चांदीच्या शयन दिवान आणि ड्रेसिंग टेबल आदींनी सुसज्ज आहे.
कात्यायिनी देवीची मूर्ती सुवर्णाची आहे. मंदिराचा गाभारा अतिशय आकर्षक आहे. देवीला किंमती आभूषणे ,अलंकार आणि वस्त्रे प्रावरने यांनी सजविलेले असते. मंदिराची भव्यता आणि संगमरवरी कलाकुसर यांचे सुरुवातीला कौतुक वाटते पण पुढे एकापेक्षा एक सुंदर देखण्या इमारती आणि अदभुत मंदिरं पाहिल्यावर मन प्रसन्न आणि तृप्त होतं.

परिसरात २० मंदिरे
कात्यायिनी देवी प्रमाणेच येथे भगवान शिव-पार्वती,भगवान विष्णु आणि लक्ष्मी, सीता-राम, गणपती महिषासुरमर्दिनी, अष्टभुजा देवी, झंपीर मंदिर, मार्कंडेय मंदिर नागेश्वर मंदिर, महाकाय त्रिशूल व डमरू बाबा संत नागपाल यांची भव्य समाधी इत्यादि प्रमुख देवतांची आकराने मोठी आणि अतिशय देखणीमंदिरं आहेत. ७० एकरच्या या मंदिर परिसरांत २० मंदिरं आहेत.त्यामुळेच दिल्लीच्या विशाल आणि देखण्या देवस्थानांत छत्तरपुर मंदिराचा अग्रक्रम लागतो.
रंगी बेरंगी झाडे
मंदिराच्या समोर एक वृक्ष सर्व भाविकांचे लक्ष्य वेधून घेतो. रंगीत बांगड्या -चुडियां आणि रंगी बेरंगी धाग्यांनी हे झाड सदैव बहरलेलं असतं कारण येथे येणारे भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या वृक्षाला रंगीत धागे बांधतात.चुडियां म्हणजे बांगड्या अर्पण करतात.

कुलुप लावलेले प्रवेशद्वार
मंदिराच्या सुरुवातीला एक भव्य नक्षीदार प्रवेशद्वार आहे.हे प्रवेशद्वार वैशिष्ट्येपूर्ण असल्याचे सांगतात. या प्रवेशद्वाराचा दरवाजा बंद असून त्याला भले मोठे कुलुप लावलेले आहे. भाविक अतिशय श्रद्धेने या बंद दरवाजाचे दर्शन घेतात. हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीचे आहे. मंदिराच्या ट्रस्ट द्वारे अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. मंदिर परिसरांत या ट्रस्टचे व्यवस्थापन असलेली शाळा आणि धर्मदाय दवाखाना आहे. ट्रस्ट तर्फे ‘शिवानी विद्या निकेतन’, ‘श्रीसंत नागपाल प्रद्योगिकी शिक्षा संस्थान’ ,’संत बाबा नागपाल संस्कृत महाविद्यालय’ आणि ‘संत नागपाल पब्लिक स्कुल’ या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.

मंदिरातील प्रमुख उत्सव
छत्तरपुर देवी मंदिरांत वर्षभर विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. मात्र दुर्गापूजा आणि नवरात्रोत्सव या काळात दररोज लाखो भाविक विविध वाहनानी येथे येतात. पायी येणार्या भाविकांची संख्याही लक्षनीय असते. कुतुबमीनार आणि लोटस टेम्पल या जगप्रसिद्ध पर्यटन स्थलापासून जवळअसल्याने दररोज देखील देशी आणि परदेशी पर्यटक येथे मोठ्यासंख्येने येतात. गुरगाव-महरौली महामार्गावर हे मंदिर आहे तसेच मेट्रो स्टेशन देखील जवळ आहे
पूजाविधि
सर्व सामान्य भाविकाप्रमाणेच देवीची तांत्रिक साधना करणारे भक्त देखील येथे मोठ्या प्रमाणात येतात. कुंडलिनी जागृत करण्याचा तांत्रिक विधि येथे केला जातो असे म्हणतात. नवरात्रोत्सवात सहाव्या दिवशी येथे विशेष पूजेचे आयोजन केले जाते त्यावेळी हजारो साधक या पूजेत सहभागी होतात.

देशातील पाहिले थ्री डी हनुमान!
छत्तरपुर येथील देवी मंदिराच्या परिसरांत १०१ फुट उंच हनुमान मूर्ती असून हे देखील येथील विशेष आकर्षण आहे.
देशांत थ्री डी रुपांत दिसणारे हे पहिले हनुमान आहेत असे सांगितले जाते. येथील हनुमान मूर्ती १०१ फूट उंच असून या मूर्तीवर थ्री-डी शोच्या वेळी ३० हजार ल्युमन क्षमतेच्या प्रोजेक्टर द्वारे हाय डेन्सिटी लाइट्स सोडले जातात. त्यामुळे छतरपुर मंदिरांत हा शो सुरु होताच जणू साक्षात हनुमान प्रकटतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. थ्री -डी चा प्रभाव इतका पावरफुल असतो की तिथे उपस्थित असलेले शेकडो भाविक जणू मंत्रमुग्ध होतात. साक्षात आकाशाला भिडलेले हनुमान आपल्या पुढे प्रकट झाले आहे असा आभास निर्माण होतो. पहिल्यांदा हा शो पाहणारा तर हनुमानाचे हे रूप कधीच विसरु शकत नाही. शेकडो भाविकांना एकाच वेळी जणु ईश्वर दर्शन होते. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाचे विराट रूप पाहून अर्जुनाची जशी स्थिती झाली असेल तशीच अवस्था हा हनुमान पाहणारांची होते. अकरा मिनिटे हा लेजर शो चालतो. आठवडयातून तीन दिवस हा लेजर शो दाखविला जातो.
छतरपुर येथील हनुमान मूर्ती दोन पायांवर उभी आहे. ही मूर्ती लाल रंगात रंगविलेली आहे. उजवा हात आशीर्वाद देत असून डाव्या हातांत गदा धारण केली आहे. हनुमानाच्या पायात चांदीचे तोड़े असून पायांत खडावा देखील आहेत. हनुमान मूर्ती उंचावर असून अनेक पायर्या चढून वर जाता येते. येथून संपूर्ण परिसर अतिशय विहंगम दिसतो.

दररोज भंडारा :
लक्ष वेधी मंदिराप्रमाणेच येथे अतिशय भव्य भोजनालय देखील आहे येथे दररोज भंडारा आयोजन केले जाते. मंदिरांत 24 तास धार्मिक कार्यक्रम पूजा व प्रार्थना यांचे सुयोग्य आयोजन केलेले असते.
छत्तरपुर येथील सर्व मंदिरं संगमरमरी दगड वापरून तयार करण्यात आली आहेत. या परिसरांत विविध देवी देवतांची २०-२२ मंदिरं आहेत. सर्व मंदिरं अतिशय सुंदर कलाकुसर युक्त आहेत. संपूर्ण परिसर पहायला किमान दोन ते अडीच तास वेळ लागतो. २००७ पर्यंत हे दिल्लीतले आणि देशांतले सर्वांत मोठे देवस्थान म्हणून प्रसिद्ध होते. २००७ साली १०१ एकर जागेवर अक्षरधाम मंदिराचे लोकार्पण झाल्यावर तर या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली.नवरात्रांत तर छतरपुर येथील मंदिरांत पाऊल ठेवायला देखील जागा नसते.

संपर्क: श्री आद्य कात्यायिनी शक्तिपीठ मंदिर ट्रस्ट,छत्तरपुर नवी दिल्ली -११००७४
दूरध्वनी ०११-२६८०२९२५/ ०११-२६८०२३६०/ ०११-२६८०३११५
– लेखक : विजय गोळेसर मोबाईल ९४२२७६५२२७
Worlds Largest Temple Chhatarpur Katyayini Devi Temple by Vijay Golesar
India Darpan Special Article Column Religious Delhi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जयभवानीरोडवर महिलेचे १ लाख २० हजार रूपयाचे मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबाडून नेले

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचा पतीला प्रश्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250823 WA0414 1
स्थानिक बातम्या

‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे येवल्यात स्पेशल स्क्रिनिंग…मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

ऑगस्ट 23, 2025
GzBKF1PXoAA7lsG
महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरे यांनी घेतली मंत्री आशिष शेलार यांची भेट…पत्रकार परिषद घेऊन सांगितले भेटीमागील कारण

ऑगस्ट 23, 2025
GzCFBWUa8AAKrj5
मुख्य बातमी

राज्यभरातून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या…मुख्यमंत्र्यांनीच दिली ही माहिती

ऑगस्ट 23, 2025
post
संमिश्र वार्ता

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित…हे आहे कारण

ऑगस्ट 23, 2025
Untitled 38
महत्त्वाच्या बातम्या

ईडीची मोठी कारवाई…आमदाराला अटक, १२ कोटीची रोख रक्कम व ६ कोटीचे दागिने जप्त

ऑगस्ट 23, 2025
WhatsApp Image 2025 08 22 at 18.17.36
संमिश्र वार्ता

विठू माझा लेकुरवाळा’ने श्रोते मंत्रमुग्ध…२५० बालकलावंतांचा भक्तीचा जागर, रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ऑगस्ट 23, 2025
प्रातिनिधिक फोटो
इतर

अल्पवयीन मुलीस परिचीताने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

ऑगस्ट 23, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पाच लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

ऑगस्ट 23, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - पत्नीचा पतीला प्रश्न

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011