मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – एका बटण दाबले की टीव्ही, फॅन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण सुरू होते. मात्र, एकाच बटणार चक्क कारचा रंग बदलला तर. स्वप्नवतच वाटते आहे ना. पण, हे आता वास्तवात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे. त्यामुळेच सध्या जगभर या कारचीच चर्चा सुरू आहे.
बीएमडब्ल्यू या जर्मनीच्या कार निर्माता कंपनीने जगातील पहिली रंग बदलणारी (कलर चेंजिग कार) कार बाजारात आणली आहे. लास वेगासमध्ये सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रिक शोमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. BMW iX Flow नावाच्या या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक इंक टेक्नोलॉजी वापतात. हे तंत्रज्ञान साधारणतः ई-रिडर्समध्ये दिसून येते. कारच्या बाहेरील भाग ग्रे आणि व्हाइट रंगात वेगवेगळे पॅटर्नमध्ये बदलू शकते.
असे काम करेल तंत्रज्ञान
बीएमडब्ल्यू रिसर्च इंजिनिअर स्टेला क्लार्क सांगतात, “हे तंत्रज्ञान ई इंकचा वापर करून वास्तवात रंग बदलते. आम्ही ज्या मटेरिअलचा वापर केला आहे, ते एका पातळ पेपरसारखेच आहे. आम्हाला हे मटेरिअल कारसारख्या थ्री डी ऑब्जेक्टवर वापरायचे होते. कारच्या पृष्ठभागावर ई-इंक कोटिंग देण्यात आली आहे. यामध्ये पांढर्या रंगाचे निगेटिव्ह चार्ज आणि काळ्या रंगाचे पॉझिटिव्ह चार्ज पिगमेंट आहे. फोन अॅपच्या माध्यमातून जेव्हा या पिगमेंट्सला सिग्नल पाठविले जाते तेव्हा त्याचा रंग बदलतो.”
बघा, कारचा रंग बदलणारा हा व्हिडिओ
https://twitter.com/BMW/status/1478803630379651083?s=20
क्लार्क सांगतात, माझ्या नजरेत या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा वापर सनलाइट रिफ्लेक्शनसाठी करू शकतो. उष्ण किंवा खूप ऊन असलेल्या दिवसांमध्ये सूर्याची किरणे परावर्तित करण्यासाठी कारचा रंग तुम्ही पांढरा करू शकतात. तर थंडीच्या दिवसात उष्णता शोषून घेण्यासाठी काळ्या रंगाचा वापर करू शकतात. भविष्यात रंग बदलण्यासाठी कारच्या डॅशबोर्डवर एक बटन देण्यात येणार आहे. तो हाताच्या इशार्यांनी नियंत्रित केला जाऊ शकेल.