गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

by India Darpan
मार्च 22, 2023 | 2:23 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


गडचिरोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकीटांच्या दरात पन्नास टक्के सवलत देण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाचा महामंडळाला फायदा होत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीदेखील महिलांसाठी अर्धे तिकीट लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अर्ध्या दरात तिकीट असल्याने महिलांची पसंती मिळत एसटीला मिळत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यापासून राज्यातील प्रत्येकच जिल्ह्यात महिला मोठ्या संख्येने एसटी महमंडळाच्या बसने प्रवास करताहेत. याचा थेट फटका खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसत आहे. परिणामत: गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनने आता खासगी बसमध्येही महिलांना निम्म्या दरात तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात नुकतीच गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. बैठकीमध्ये गडचिरोली–चंद्रपूर मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता खाजगी बसेसमध्ये सुध्दा महिला प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येईल असा विश्वास संघटनेचे सदस्य राजू कावळे यांनी व्यक्त केला आहे.

चारच दिवसांत ४८ लाख महिलांचा प्रवास
महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास हा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर राज्यभरातील बसमध्ये महिला प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. निर्णयानंतर चारच दिवसात राज्यात सुमारे ४८ लाख महिला प्रवाश्यानी प्रवास केलाय. जो एकूण प्रवासी संख्येच्या ३० टक्के आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यभरातील बसस्थानकांवर आणि बसमध्येही महिला प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. ताई, माई, अक्का, काकू, मावशी आणि आजी सगळ्या प्रवासाला निघाल्या आहेत.

Women’s Also get 50 Percent Ticket Concession in Private Travel Bus

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Next Post

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011