इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ईश्वराने महिलांना मातृत्व लाभण्याची देणगी दिली आहे, त्यामुळे विवाह झालेल्या बहुतांश महिला मातृत्व सुखासाठी आस धरून असतात, मात्र काही वेळा एक ऐवजी दोन किंवा तीन मुले होतात. त्यांना जुळे किंवा तिळे म्हणतात. मात्र एकाच वेळी पाच मुले होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानले जाते. एका महिलेला एकाच वेळी पाच मुले झाली, परंतु ‘दैव देते आणि कर्म नेते ‘ असे म्हटले जाते, त्या महिलेच्या बाबतीतही अशी दुर्देवी ही घटना घडली.
राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील मासलपूर येथील पिरानी गावात राहणाऱ्या रेश्माने करौली येथील जिल्हा रुग्णालयात महिलाने पाच बाळांना जन्म दिला. एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे वृत्त संपूर्ण रुग्णालयात वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यानंतर सर्वचजण बाळांना पाहण्यासाठी दाखल झाले.
लग्नानंतर सात वर्षानंतर ही महिला गरोदर राहिली होती. लग्नानंतर अनेक वर्षांनी घरात लहान मुलांचे आगमन होणार होते. तब्बल सात वर्षांनी या महिलेला आई होण्याचे सुख मिळणार होते. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्य आनंदात होते. मात्र, या महिलेची प्रसुती झाली आणि काही क्षणात हे वातावरण दु:खात बदलेले गेले. कारण तिचे एकही मुल वाचले नाही. या घटनेमुळे महिलेवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. ही महिला पूर्णपणे खचून गेले आहे. या महिलेच्या बाळाला वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
रेशमा असे या महिलेचे नाव असून ती मासलपुर क्षेत्रातील पिपरानी गावात राहणारी आहे. या महिलेची वेळेआधीच म्हणजेच सात महिन्यातच प्रसुती झाली होती. त्यामुळे प्रसुतीनंतर तिची पाचही मुले अत्यंत नाजूक जन्माला आली होती. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पाच मुलांच्या जन्माच्या वेळेत एक ते दीड मिनिटांचे अंतर होते. पाचही मुलांचे वजन 300 ते 600 ग्राम होते. महिलेने 2 मुले आणि तीन मुलींना जन्म दिला होता.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रसुतीदरम्यान लाखो महिलांमधून एकाच्या बाबतीत अशी घटना घडते. करौली जिल्हा रुग्णालयाचे एनआयसीयूचे प्रभारी डॉ. महेंद्र मीणा यांनी सांगितले की, सर्व मुलांचे वजन कमी होते. या मुलांसाठी आवश्यक ती वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना जयपूर येथील जेके लॉन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. यापैकी दोन मुले आणि दोन मुलींचा वाटेतच मृत्यू झाला. तर एका बाळाचा जेके लॉन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
सदर महिलेचा पती अश्क अली हा केरळमध्ये मार्बल फिटिंगचं काम करतो. त्याचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, लग्न झाल्यापासून त्यांना आपत्य नव्हतं. त्यामुळे या दाम्पत्याने अपत्य होण्यासाठी विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा घेतले होते. अखेर सात वर्षांनी रेश्मा गरोदर झाली आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही.
Women Give birth to 5 children’s at same time