नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझे वडील माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे, असा खळबळजनक खुलासा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी आज केला. दिल्ली सरकारच्या एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझी आई, मावशी, मावसा आणि आजी-आजोबांमुळे मी या दुःखातून बाहेर येऊ शकले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालीवाल म्हणाल्या की, मी लहान असताना माझे वडील माझे शोषण करायचे. ते मला मारायचा, त्यामुळे मी पलंगाखाली लपायचे. घरी आल्यावर त्यांची खूप भीती वाटायची. महिलांना त्यांचे हक्क मिळतील अशा पद्धतीने मी रात्रभर नियोजन करत असे. महिला आणि मुलींचे शोषण करणाऱ्या अशा पुरुषांना मी धडा शिकवेन.
एक किस्सा सांगताना त्या म्हणाला की, मला अजूनही आठवते, जेव्हा ते मला मारायला यायचे तेव्हा माझे केस पकडून माझे डोके भिंतीवर आपटत असे. त्यामुळे दुखापत होऊन रक्त येत असे.
पुढे त्या म्हणाल्या की, माझा विश्वास आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खूप अत्याचार होतात तेव्हाच तो इतरांचे दुःख समजू शकतो. तेव्हाच त्याच्यात अशी अग्नी जागृत होते की तो संपूर्ण व्यवस्थेला हादरवून सोडतो. कदाचित माझ्यासोबतही असेच घडले असेल आणि इथल्या सर्व पुरस्कार विजेत्यांच्याही अशाच कथा असतील.
https://twitter.com/ANI/status/1634502521149431808?s=20
Women Commission Chief Swati Maliwal on Father Sexual Abuse