पतीच्या छळाला कंटाळून या महिलेने घेतला हा मोठा निर्णय; देशभरात चर्चा

प्रातिनिधीक फोटो
जयपूर – नवरा आणि सासरच्यांनी त्रासाला कंटाळून राजस्थानमधील एका महिलेने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याची राष्ट्रपतींकडे परवानगी मागितली आहे. प्रचंड त्रास दिला जातो म्हणून तिला असे पाऊल उचलण्यास भाग पाडले जात आहे.
   अजमेर येथील तिन मुलांसह एक महिला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली आणि तिने जिल्हाधिकाऱ्याना निवेदन सादर करून ते राष्ट्रपतींना पाठविण्यास सांगितले. त्या निवेदनात तिने मुलांसह आत्महत्या करण्याची परवानगी मागितली. सदर पीडित महिलेने तिच्या सासरच्यांनी मुलांसह मला घराबाहेर घालण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
     आपल्या निवेदनामध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझे लग्न २९ जानेवारी २००७ रोजी झाले असून पती नेहमी सासू आणि मेहुण्यांच्या सांगण्यावरून हुंड्याची मागणी करीत अनेक वर्षे अत्याचार करत होता. आता मी माझ्या तीन मुलांसह चार वर्षांपासून स्वतंत्र राहात आहे. तरीही सासरचे लोक तिला त्रास देत आहेत. गेल्या चौदा वर्षांपासून तिचा नवरा तिला त्रास देत असल्याने अशा परिस्थितीत मरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.’