पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर तुम्ही नोकरी करत नसाल, किंवा तुम्हाला नोकरी करण्याची इच्छा नसेल, तर अशा परिस्थितीत अर्थार्जन करण्यासाठी काय करावे, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. परंतु नोकरी न करताही तुम्ही पैसे कमवू शकता असे जर आम्ही सांगत असू, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का? तुम्ही नक्कीच विश्वास ठेवू शकता. कारण विनानोकरी पैसे कसे कमवू शकता येतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही मुक्त काम म्हणजेच फ्रीलान्स वर्क (Freelance work) करू शकता. म्हणजेच तुम्ही फ्रीलान्सर बनू शकता. यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीसाठी नोकरी नव्हे, तर प्रोजेक्टवर आधारित कामे करू शकतात. यामध्ये प्रोजेक्टच्या हिशेबानुसार किंवा तुमच्या वेळेनुसार पैसे मिळतील.
फ्रीलान्स कामे कुठे मिळेल?
आपल्याला फ्रीलान्स काम कोण देईल असा जर तुम्ही विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, फ्रीलान्स काम शोधण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतींचा वापर करू शकतात. इंटरनेटवर अनेक संकेतस्थळे आहेत, जे फ्रीलान्स काम करणारे आणि कंपन्यांमधील दुवा असतात. उदाहरणार्थ अपवर्क. कॉम, फ्रीलान्स.कॉम, फिव्हर. कॉम इत्यादी. या संकेतस्थळावर तुम्ही तुमचे अकाउंट उघडून फ्रीलान्स काम करू शकतात.
सोशल मीडिया, वैयक्तिक संपर्क
त्याशिवाय सोशल मीडियाची मदतही तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला जे काम येते, ते त्याच्याशी संबंधित माहिती सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करा आणि फ्रीलान्स काम करण्यासाठी उपलब्ध असल्याची सूचना करा. असे केल्यास जगाला फ्रीलान्सर म्हणून तुमची ओळख होईल. या माध्यामतून अनेक जण तुम्हाला काम देतील. फ्रीलान्स काम देणारे संकेतस्थळ आणि सोशल मीडियाशिवाय तुम्ही तुमच्या वैयक्तिक संपर्कांचा वापर करू शकता. तुमच्या संपर्कातील कोणती व्यक्ती तुम्हाला फ्रीलान्स काम देऊ शकेल तसेच तुमची शिफारस करू शकेल हे ही तुम्हाला शोधावे लागेल.
मागणी वाढली
फ्रीलान्स काम करताना तुम्ही एक चांगले उमेदवार आहात हे तुम्हाला काम देणार्या व्यक्तीला किंवा कंपनीला पटवून द्यावे लागते. एकदा कंपनीला किंवा संबंधित व्यक्तीला खात्री पटली, की तुम्ही फ्रीलान्स काम करू शकतात. गेल्या काही काळापासून फ्रीलान्स काम करणार्यांची संख्या वाढली आहे. तसेच फ्रीलान्स कामे करणार्या उमेदवारांची मागणीही वाढली आहे. तुम्हाला मिळणार्या कामावर त्या बदल्यात मिळाणारे मूल्य ठरू शकते. फ्रीलान्स कामातून चांगली मिळकत होते. अनेक नागरिक फक्त फ्रीलान्स कामे करून लाखोंची कमाई करतात.