नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित करण्यात आलेल्या हृदयविकार शस्रक्रिया आणि उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक बालकांवर उपचार करण्यात आले. ७२ तासांत तब्बल ५२ बालकांवर मोफत यशस्वी हृदय उपचार झाले. शिरपूर, साक्री व मालेगाव परिसरातील सर्वाधिक बालकांचा यात समावेश होता.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच शिरपूरहून धुळे आणि धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटल कॉरीडोर साकारण्यात आला. याद्वारे तात्काळ खासगी वाहनातून 62 बालकांसह नातेवाईकांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान, रुग्णांसह नातलगांची सर्वच काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आली. एसएमबीटी हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे व नंदुरबार नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. दर महिन्याला हॉस्पिटलकडून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. यादरम्यान, यादरम्यान बालकांसाठी मोफत तर प्रौढांसाठी अल्प दरात तपासण्या केल्या जातात. गेल्या महिन्यात शिरपूरसह परिसरात हृदय तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकाच दिवशी विक्रमी अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी याप्रसंगी करण्यात आली.
सकाळपासून सुरु झालेले आरोग्य शिबीर रात्री उशिरापर्यंत सुरु होते. आतापर्यंत याठिकाणी झालेल्या शिबिरातील सर्वात मोठे आणि उत्तम नियोजन असलेले शिबीर असल्याची भावना धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) च्या टीमने व्यक्त केली. तसेच आरबीएसकेच्या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटल आयोजित शिबिरात अनेक बालकांना मोफत उपचारार्थ दाखलदेखील करून घेण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये २४८ बालकांच्या पालकांनी नोंदणी केली होती. त्यातील १६३ रुग्णांनी शिबिरात तपासणी करण्यात आली. यातील ६५ बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरासाठी स्थानिक उद्योगपती आणि विधानपरिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम हॉस्पिटल) ने सहकार्य केले.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट (हृदय विकार कक्ष) हा स्वतंत्र विभाग रुग्णसेवेसाठी वर्षातील ३६५ दिवसही सुरू असतो. या विभागात गत सात वर्षात ह्रदय विकारांवरील १८ हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. नागरिकांनी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारावी, हा मुळ हेतू एसएमबीटी हॉस्पिटलचा आहे. त्या दृष्टीने वाटचाल सुरू असताना स्थापनेपासून ते आतापर्यंत रुग्णांना अद्यावत, दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात हॉस्पिटल प्रशासन यशस्वी ठरले आहे.
आम्ही मूळ जळगावचे. सध्या भिवंडीला राहतो. आमच्या मुलीवर हृदयउपचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा मोठे टेन्शन आले होते. यानंतर आम्हाला फेसबुकवर एसएमबीटीचा संपर्क क्रमांक मिळाला. इथे संपर्क केल्यानंतर त्यांनी योग्य मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे भिवंडी ते एसएमबीटी हा प्रवास सोप्पा झाला. यशस्वी उपचारानंतर माझ्या मुलीला नवा जन्मच एसएमबीटीने दिला आहे.
– संतोष सोनवणे, यज्ञाचे वडील, भिवंडी (जि. ठाणे)
माझ्या भावाच्या मुलाला हृदयाचा त्रास होता. अनेक डॉक्टरांकडे तपासणीला उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी मोठा खर्च या ऑपरेशनसाठी येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्यात शिबीर असल्याचे समजले. यानंतर हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि ऑपरेशन झाले. माझ्या पुतण्याच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान पाहून आज आनंद होत आहे. हॉस्पिटलमधील जेवण दर्जेदार आणि स्वच्छताही तितकीच नीटनेटकी आहे.
– रवींद्र पावरा, सत्यमचे काका, शिरपूर (जि. धुळे)
माझा मुलगा दहा वर्षांचा आहे. त्याला दमाचा त्रास होता अनेक उपचार केले पण फरक पडला नाही. यानंतर एका डॉक्टरकडून आम्हाला त्याच्या हृदयाच्या आजाराबाबत समजले. तेव्हापासून अगदी मुंबई पर्यंत मी त्याला घेऊन उपचारासाठी फिरलो. कधी कागदपत्रांची अडचण तर कधी पैशांची यामुळे हैराण झालो होतो. यानंतर मी या दवाखान्यात असलेल्या शिबिरात सहभागी झालो. येथील डॉक्टर, स्टाफ यांनी आम्हाला खूप मदत केली.
– अजमल चव्हाण, कुणालचे वडील, जळगाव
या महिन्यातही शिबिराचे आयोजन
या महिन्यातही हृदय उपचार व शस्रक्रिया शिबिर चौथ्या शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात आले आहे. आपल्याही बालकांस हृदयाचा त्रास असल्यास आणि मोफत उपचार करून घ्यावयाचे असल्यास एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये तात्काळ रुग्णाची तपासणी करून घ्यावी. येथील तज्ञ डॉक्टर्स बालकांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देण्यास २४ तास उपलब्ध आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी हॉस्पिटलकडून दर महिन्यात हे शिबीर आयोजित केले जात असून आतापर्यंत हजारो बालकांवर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
असा होता शिरपूर-धुळे-धामणगाव कॉरिडोर
एसएमबीटी हॉस्पिटलकडून आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात शिरपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यादरम्यान, 62 बालक व त्यांच्या नातलगांना मिळून १५६ जणांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. विशेष म्हणजे, यातील ५२ बालकांवर यशस्वी मोफत उपचारदेखील करण्यात आले. ग्रामीण भागातील निरोगी आरोग्यासाठी आयोजित शिबिराद्वारे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना एकाच दिवशी आणण्यात आले होते.
हार्ट इन्स्टिट्यूटला पसंती
एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार, शस्त्रक्रिया होऊन त्यांना नवजीवन मिळाले आणि मिळतही आहे. नवजात बालकांपासून ते अगदी वयोवृद्धांवर हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार, शस्त्रक्रिया होतात. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णवेळ उपलब्ध आहेत. योजनेच्या माध्यमातून दर्जेदार उपचारांबरोबरच शस्त्रक्रिया देखील पूर्णपणे मोफत असल्याने नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारांसाठी एसएमबीटीत येतात. रुग्णांचा विश्वास दिवसागणीक वाढत असून एसएमबीटी हॉस्पिटलच्या सेवेचा नावलौकिक राज्यभर आहे.
नातेवाईकांची जेवणाची, राहण्याची सोय
हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा, नातेवाईकांचा देखील विचार हॉस्पिटल प्रशासन करते. रुग्णांना सुविधा मिळतात त्याचबरोबरच त्यांच्या नातेवाईकांची देखील जेवणाची, राहण्याची चांगली सोय केली जाते. त्यामुळे दुरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची कुठलीही परवड होत नाही.
Within 75 Hours 52 heart Operations Special Corridor
Children’s SMBT Hospital Nashik