मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हिवाळ्यात नाक कोरडे का पडते? जाणून घ्या कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

by Gautam Sancheti
डिसेंबर 3, 2021 | 5:28 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नागपूर – भारतात हिवाळ्यातील हवामान आल्हाददायक असते. कारण आपण ऑक्टोबर हीटच्या कडक उन्हाने आणि घामाने त्रस्त असतो. तेव्हा हिवाळा लवकर यावा हीच सर्वांची देवाजवळ प्रार्थना असते. आणि हिवाळा आपल्यासोबत अनेक सण, पाककृती आणि खूप आरामदायक वातावरण घेऊन येतो. पण हिवाळा हा ऋतू (मोसम) अनेक समस्या देखील घेऊन येतो.

तापमानात मोठी घट झाल्यामुळे मानवी त्वचेसाठी अनेक समस्या निर्माण होतात. त्याहूनही जास्त मोठी समस्या म्हणजे कोरडे नाक होणे. असे आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत घडते. कोरडे नाक किंवा बंद नाक हिवाळ्यात बहुतेकांना त्रास देणारी एक सामान्य समस्या आहे. परंतु त्यातून सुटका करून घेण्यासाठी काही जण नाकात बोट घालण्याचा प्रयत्न करतात, ते खूप वाईट दिसते. त्यामुळे आपल्याला ही समस्या टाळायची असेल तर सर्वात आधी त्याचे कारण जाणून घ्या. हिवाळा सुरू होताच नाकाचा आतील भाग इतका कोरडा का होतो हे आपल्याला माहीत आहे का? कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि तात्काळ उपाय जाणून घेऊ या…

कारणे
हिवाळ्यात नाक कोरडे होण्याची समस्या सर्दीमुळे होते. कोरड्या नाकाच्या समस्येला ड्राय सायनस देखील म्हणतात. हे नाकाच्या आत असलेल्या श्लेष्मल त्वचेतील ओलावामुळे होते. जेव्हा तुमच्या नाकाच्या आत असलेल्या श्लेष्मल छिद्रामध्ये कमी आर्द्रता असते, तेव्हा कोरडे नाक किंवा कोरडे सायनसची समस्या उद्भवते. त्यामुळे नाकाची नळी कोरडी पडते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. याचे कारण काही वाईट पर्यावरणीय परिस्थिती देखील आहे. त्यामुळेच ही समस्या उन्हाळ्यातही उद्भवते, कारण वातावरणात ओलावा नसतो. काही वेळा औषधांच्या दुष्परिणामांमुळेही नाक कोरडे पडण्याची समस्या सुरू होते.

उपाय
दिवाळीच्या धामधुमीनंतर सर्वांना आरामदायी सत्राची गरज आहे. कोरड्या नाकासाठी घरगुती उपाय आहेत. घशात विचित्र भावना, सायनस दुखणे, रक्तस्त्राव, नाक कोरडे पडणे कसे टाळता येईल हे जाणून घ्या

खोबरेल तेल
हिवाळा ऋतूत खोबरेल तेलाला खूप मागणी असते, कारण आपल्या सर्वांना त्याचे फायदे माहित आहेत. नाकात खोबरेल तेल लावल्याने कोरडेपणा दूर होतो. कारण ते पेशींमधील जागा भरून कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. पण जास्त खोबरेल तेल लागणार नाही याची काळजी घ्यावी, नाकातील कोरडेपणा दूर करण्यासाठी दिवसातून फक्त काही थेंब पुरेसे आहेत.

कोमट पाण्यात भिजवलेला रुमाल
हिवाळ्यात आपण सर्वजण आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतो. कोरड्या नाकाच्या समस्येवरही हा उपाय असू शकतो. आपल्याला जेव्हा असे वाटते की नाक कोरडे आहे, तेव्हा त्यासाठी कोमट पाण्यात भिजवलेला रुमाल वापरू शकता. आपले नाक कोमट पाण्याने ओले नॅपकिनने स्वच्छ करा.

पिण्याचे पाणी
हिवाळ्यात लोकांची तहान बहुतेक वेळा कमी होते किंवा उन्हाळ्याच्या तुलनेत आपण हिवाळ्यात कमी पाणी पितो. हे देखील नाक कोरडे होण्याचे एक कारण आहे. भरपूर पाणी प्यायल्याने अनेक समस्या टाळता येतात. या ऋतूत तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता.

बदाम तेल
नाकातील कोरडेपणा दूर करण्यासाठी बदामाचे तेल उत्तम पर्याय आहे. बदामाचे तेल लावल्याने या समस्येवर सहज मात करता येते. पण ते कोरफड जेलमध्ये मिसळल्यानंतर ते अधिक फायदेशीर ठरते. कोरड्या नाकाची समस्या दूर करण्यासाठी या दोघांचे मिश्रण कापसाच्या मदतीने रात्री नाकात लावावे.

पेट्रोलियम जेली
पेट्रोलियम जेली कोरड्या नाकाच्या समस्येपासूनही सुटका करू शकते. कारण त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवण्यास जेली उपयुक्त आहे. तसेच नाकात पेट्रोलियम जेली लावून कोरड्या नाकाची समस्या टाळता येते. रात्री झोपताना बोटांच्या साहाय्याने नाकात पेट्रोलियम जेली व्यवस्थित लावा. मात्र, त्याचा जास्त वापर करू नका, कारण जेली जास्त आणि रोज लावल्याने फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोणत्या रंगाचे तूप जास्त आरोग्यदायी? पांढरे की पिवळे?

Next Post

हा स्मार्टफोन ट्रॅक करणार हृदय गती; कॅमेरा करणार खुप सारी कामे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FFiCopJX0AMqXg

हा स्मार्टफोन ट्रॅक करणार हृदय गती; कॅमेरा करणार खुप सारी कामे

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011