मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. कोरोना निर्बंध आणखी कडक केले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हाबंदीसह अनेक निर्णय घेण्यात आले होते. आताही तसाच निर्णय होणार का, मुंबईत हजारोच्या संख्येने रुग्ण बाधित होत असल्याने लोकल रेल्वेची सेवा बंद केली जाणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दुसऱ्या लाटेसारखी स्थिती सध्या नाही. त्यामुळे लॉकडाऊन लावले जाणार नाही. लोकल रेल्वे बंदचा कुठलाही प्रस्ताव नाही. तसेच, राज्यात जिल्हांतर्गत बंदीही केली जाणार नाही, असे डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे. बघा, आरोग्यमंत्री काय म्हणत आहेत
https://twitter.com/NCPspeaks/status/1479052485838786560?s=20