India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

फौजदार पतीला पत्नीने भर बाजारात गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले; मग, काय….

India Darpan by India Darpan
January 1, 2023
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या पत्नीने जर भर बाजारात आपल्या पतीची कॉलर पकडली तर काय होईल ? लगेच गर्दी जमा होईल ! त्यातच तो खाकी वर्दीवाला फौजदार असेल तर मग काही विचारायलाच नको! अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली. एका महिलेने चक्क आपल्या फौजदार तथा पोलीस उपनिरीक्षक असलेल्या पतीची भर बाजारात कॉलर पकडून त्याला जाब विचारला, याचे कारण म्हणजे हा पोलीस अधिकारी चक्क आपल्या गर्लफ्रेंडसोबत थेट बाजारांमध्ये रोमँटिक मूडमध्ये चाळे करत होता. या प्रकारामुळे लगेचच बाजारात गर्दी जमा होऊन त्याची उलट सुलट चर्चा सुरू झाली. या महिलेने आपल्या पतविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी देखील मागणी केली , तसेच प्रकरण एवढे वाढले की, त्यांची वरात मग पोलीस ठाण्यापर्यंत गेली होती.

तसेच ती संतापलेली महिला म्हणाली की, मला पतीसोबत रहायचे नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्नीने पोलीस ठाण्यात केली. परंतू, पती पोलीस अधिकारी असल्याने पोलिसांनी या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस अधिकारी कॉलनीमध्ये पत्नीसोबत राहत होता. तसेच गर्लफ्रेंडलाही त्याने त्याच कॉलनीमध्येच आणून ठेवले होते.

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आहे. रौता चौकात अचानक एक तमाशा रंगला होता. मात्र कोणाला काहीच कळत नव्हते, नेमके काय झाले. एक पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या पत्नीकडून बोलणी ऐकून घेत होता. परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. बाजुला एक महिला देखील उभी होती, जी त्याच्यासोबत भर बाजारात प्रेमाचे रंग उधळत फिरत होती. त्याचे नाव दीपक शर्मा असून त्याची नियुक्ती गोरखनाथ पोलीस ठाण्यात आहे. बस्तीमध्ये तो पत्नीसोबत राहत होता. तसेच गर्लफ्रेंडलाही त्याने तेथेच आणून ठेवले होते.

नोकरीवरून घरी आल्यानंतर तो दोघांनाही भेटत होता. पीडित पत्नीने सांगितले की, तिला एक मुलगी असून घरी आल्यानंतर पतीने काही वेळातच मुलीला फिरायला घेऊन जातो असे सांगितले. पण मला त्याचे कुठेतरी काहीतरी सुरु असल्याचा संशय आला होता. म्हणून मी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर एका चौकात गेल्यावर तो एका महिलेशी खूपच जवळकीने बोलत होता. मी त्या दोघांना थांबविताच त्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे आमच्यात धक्काबुक्की झाली, असे तिने पोलिसांना सांगितले. आपल्या पतीचे गेल्या ६ वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध आहेत. असे तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

Wife Catch Husband with Girl Friend in Market
Uttar Pradesh Basti Police


Previous Post

ब्रेस्ट कॅन्सर हा आजार गंभीर आहे पण…. अभिनेत्री छवी मित्तलने सांगितला हा अनुभव

Next Post

महाराष्ट्र ठरणार लम्पी लस निर्मिती करणारे पहिले राज्य; या महिन्यात येणार

Next Post

महाराष्ट्र ठरणार लम्पी लस निर्मिती करणारे पहिले राज्य; या महिन्यात येणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group