नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने दोन दिवसीय महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक नाशिकमध्ये घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील निम्मे मंत्री, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही बैठक भाजपने नाशिकमध्ये का घेतली याचा मोठा खुलासा झाला आहे.
बैठकीच्या समारोपाचे भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,नाशिक जिल्हा आणि महानगर कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था केली. त्यांचे मनःपूर्वक आभार मनतो. शूर्पणखेचे नाक जेथे कापले गेले, ती हीच नाशिक नागरी आहे. अहंकाराचे नाक कापणारे हे शहर आहे. शत प्रतिशत भाजपाचा नारा याच शहरात दिला गेला, पण त्यावेळी ते लोकांना स्वप्न वाटले. आज स्थिती आपल्यापुढे आहे. काही शहरांचे आपले एक वेगळे महत्त्व असते. नाशिकला कोणता संकल्प केला, की तो पूर्ण करण्यासाठी साक्षात प्रभू श्रीरामचंद्र आशीर्वाद देतात, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांचे संपूर्ण भाषणाचा हा व्हिडिओ
Why BJP State Level Meeting Organized in Nashik