गुरूवार, ऑक्टोबर 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सिंघम! कोण आहेत समीर वानखेडे? आजपर्यंत या सेलिब्रेटींना पाठवले आहे त्यांनी जेलमध्ये

ऑक्टोबर 22, 2021 | 11:30 am
in संमिश्र वार्ता
0
sameer wankhede

मुंबई – बॉलीवूड सिनेमात पोलिस अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज मोहिमेविषयी अनेक चित्रपट निघाले आहेत. विशेषतः ‘सिंघम’ चा मोठा गाजावाजा झाला. प्रत्यक्षातही पोलिस खात्यामध्ये असे अनेक कर्तृत्ववान अधिकारी असतात. त्यापैकी सध्या एक नाव गाजत आहे, ते म्हणजे समीर वानखेडे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे ते झोनल डायरेक्टर आहेत. रिया चक्रवर्तीपासून ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानपर्यंतच्या प्रकरणात आपण वानखेडे यांचे नाव ऐकले असेल. मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे नक्की कोण आहेत? त्यांची आजवरची कारकीर्द नक्की कशी आहे ते आपण आता जाणून घेऊया…

समीर वानखेडे यांचा जन्म 14 डिसेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. मराठी कुटुंबात जन्मलेले समीर यांचे वडील दयदेव वानखेडे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. तर आई जेहदा वानखेडे गृहिणी आहेत. समीर यांची बहीण यास्मीन वानखेडे व्यवसायाने वकील आहे.

समीर यांनी 2008 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. भारतीय महसूल सेवेत त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईत झाली. याशिवाय, त्यांनी इन्कम टॅक्स एअर इंटेलिजन्स युनिट, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 42 वर्षीय समीर यांनी बी.ए. हिस्ट्री ऑनर्सचा अभ्यास केला आहे.

महाराष्ट्र सेवा कर विभागात काम करत असताना, 2010 मध्ये समीर वानखडे यांनी 2500 जणांवर कर चुकवेगिरी बद्दल कारवाई केली होती. यामध्ये 200 हून अधिक बॉलिवूडमधील दिग्गजांचा सहभाग होता. तसेच अनेक मोठी राजकीय व्यक्तिमत्वे होती. त्यावेळी महाराष्ट्र सेवा करांमध्ये 87 कोटी रुपयांची भर पडली.

मुंबई विमानतळ विभागात ड्युटीवर तैनात असताना समीर यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. 2011 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ हा सोन्याने मडवलेला विश्वचषक घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्यालाही समीरने सीमा शुल्क आकारले. तसेच कस्टम ड्युटी मिळाल्यानंतर त्या संघाची सुटका करण्यात आली.

परदेशी चलनांसह प्रवास करणारे प्रसिद्ध गायक मिका सिंग यांना 2013 वानखेडे यांनी विमानतळावर थांबवले. बराच वेळ चौकशी केली आणि एक लाख रुपयांच्या जामिनावर सिंग यांची सुटका केली. एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केल्यानंतर समीरने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन युनिटमध्ये एसपी म्हणून काम केले. यानंतर त्यांना महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) सहआयुक्त करण्यात आले.

समीर वानखेडे यांनी 29 मार्च 2017 रोजी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्न केले. क्रांतीने प्रकाश झाच्या गंगाजल सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने 22 मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून किंवा चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. समीर आणि क्रांतीच्या दोन मुली झैदा आणि जिया आहेत.

2019 मध्ये समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर करण्यात आले. यानंतर त्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकून 1700 कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मा यांसारखी मोठी नावेही यात समाविष्ट होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग प्रकरण पुन्हा समोर आले. यानंतर समीर वानखेडे यांनी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतले, ती सुशांतची गर्लफ्रेंड होती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती ही दोषी होता, म्हणून दोघांनाही एनडीपीएस कायद्यांतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले.

नोव्हेंबर 2020 मध्ये ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीला अटक केली होती. याच वर्षी समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या पाच अधिकाऱ्यांवर ड्रग्ज विक्रेत्यांनी हल्ला केला होता. यामध्ये दोन अधिकारी गंभीर जखमी झाले.

आता सुमारे तीन पुन्हा आठवड्यापासून ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने मुंबईतील क्रूझवर छापा टाकला. यामध्ये ड्रग्ज पार्टी करताना अनेक जण पकडले गेले. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही सहभाग होता. आता या प्रकरणात अभिनेता चंकी पांडे यांची कन्या तथा अभिनेत्री अनन्या पांडे हिची सुद्धा चौकशी सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७३२; महानगरपालिका क्षेत्रात २३७ तर पंधरा तालुक्यात ४६७ रुग्ण

Next Post

अंबानींच्या फाईलसाठी थेट राज्यपालांनाच ३०० कोटीच्या लाचेची ऑफर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

अंबानींच्या फाईलसाठी थेट राज्यपालांनाच ३०० कोटीच्या लाचेची ऑफर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011