मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षात इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने आता पेट्रोल डिझेलवर चालणारे वाहन वापरणे पडत नाही. अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी वर चालणारी वाहने वापरतात. भारतात सध्या इंधन, इलेक्ट्रिक आणि सीएनजी इंजिनवर चालणारी वाहने वाढली आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण इलेक्ट्रिक किंवा सीएनजी इंजिनचे वाहन घेण्याचा विचार करत आहेत, त्यामुळे आपण जर इलेक्ट्रिक आणि सीएनजीमधील फरकाबाबत संभ्रमात असाल, तर या दोघांमधील तुलना आपण जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रिक वाहने (EV)
भारतात अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत, इलेक्ट्रिक वाहनांची वैशिष्ट्ये म्हणजे ती चालवण्यासाठी डिझेल पेट्रोलचा वापर केला जात नाही. तर इलेक्ट्रिक वाहने फक्त एका चार्जवर लांबपर्यंत अंतर कापतात, इंधन आणि CNG वाहनांच्या तुलनेत EV थोड्या महाग आहेत, तर इन-प्लेस( ठिकठिकाणी) चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे वाहन मालकाची काही गैरसोय होऊ शकते, तथापि, ऑटोमेकर्स चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर वेगाने काम करत आहेत.
सीएनजी वाहने
CNG वाहने किंवा कार या भारतात दीर्घकाळ कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसवर चालतात. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर सारख्या अनेक कार उत्पादक कंपन्या या अशा वाहनांची जास्तीत जास्त विक्री करतात. सीएनजी वाहनांचा एक मोठा फायदा म्हणजे जीवाश्म इंधनावरील फारसे अवलंबित्व नाही आणि कमी किमतीचा फायदा होय. सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशात सध्या पेट्रोलचा दर सुमारे 95 ते 99 रुपयांच्या आसपास आहे, तर सीएनजीचा दर 53 रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालण्याचा पर्याय देखील मिळेल. जर सीएनजी संपला, तर कार पुढील सीएनजी इंधन स्टेशनवर नेण्यासाठी पेट्रोलियम वापरू शकतात.








