नवी दिल्ली – कोरोना काळात मानवी जीवनात अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच तोंडावर मास्क लावणे ही सुद्धा जीवनातील अत्यावश्यक गरज बनली आहे, त्यामुळे कोणता मास्क चांगला अशी विचारणा अनेकांकडून होत असताना एन95 मास्क प्रमाणेच सुती कपड्याचा मास्क हा सर्वात चांगला आरोग्यरक्षक आणि आरामदायी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सूक्ष्मदर्शकाच्या खाली निरीक्षण केले असता त्याची रचना खूप घट्ट असल्याचे आढळते, त्यामुळे विषाणूचा शिरकाव त्यातून होत नाही, त्या तुलनेत शिफॉन, पॉलिस्टर, रेयन किंवा इतर कृत्रिमरित्या बनविलेले कृत्रिम तंतूंचे मास्क सैल आहेत. त्यामुळे श्वासोच्छ्वास घेताना शरीरात जास्तीत जास्त विषाणू जावू शकतात. सुमारे 12 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कच्या अभ्यासासाठी अमेरिकेच्या मेरीलँड येथील स्मिथ सोनियन म्युझियम कन्व्हेन्शन इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक एडवर्ड व्हिएन्झी आणि त्यांच्या टीमने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप ) वापरला.










