व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोणते तूप आरोग्यासाठी चांगले? म्हशीचे की गायीचे?

India Darpan by India Darpan
June 23, 2022 | 5:12 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
आपल्या भारतीय संस्कृतीत तूपाला खूप जास्त महत्त्व आहे. कोणतीही पूजा तूपाशिवाय पूर्ण होत नाही. तसेच जेवणात देखील तूप महत्वाचे आहे. भारतीय घरांमध्ये वरण असो किंवा चपाती, तुपाशिवाय जेवण सुरू होत नाही. अनेकांना तूप जेवणात खाणे खूप आवडते. तुपामुळे शरीरात ताकद राहते आणि आवश्यक पोषक तत्वेही मिळतात, असे घरातील मोठी माणसे म्हणतात.

कारण गावराणी किंवा देशी तूप आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि गुणकारी मानले जाते. त्यामुळेच रोज एक चमचा देशी तूप खाणे फायदेशीर असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. देशी तूप जेवणाला चवदार तर बनवतेच पण पौष्टिकतेनेही परिपूर्ण बनते. डाळ, रोटी किंवा पराठा असो, देसी तूप प्रत्येक पदार्थाची चव वाढवते. तुप खल्ल्याने वजन वाढेल, या विचाराने अनेक जण देसी तुपाचे सेवन करत नाहीत, पण देशी तूप भरपूर फायदेशीर आहे.

देशी तूप हे त्वचा, केस, पचन संस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. आपण बाजारात दोन प्रकारचे तूप पाहिले असेल, एकाचा रंग पांढरा आणि दुसरा रंग पिवळा असतो. अशा वेळी प्रश्न पडतो की, पांढरे की पिवळे, कोणते देशी तूप जास्त आरोग्यदायी आहे? मात्र प्रथम हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, पांढरे तूप म्हशीच्या दुधापासून बनते, पिवळे तूप गाईच्या दुधापासून बनवले जाते.

पांढर्‍या तुपामध्ये पिवळ्या तुपापेक्षा कमी फॅट असते. त्यात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने ते दीर्घकाळ टिकवून ठेवता येते. हे मजबूत हाडे राखण्यास, वजन वाढविण्यात आणि हृदयाच्या स्नायूची क्रिया वाढविण्यात मदत करते. म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या घटकांनी समृद्ध आहे.

गाईचे तूप वजन कमी करण्यासाठी चांगले आहे, ते प्रौढ आणि मुलांमधील लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते आणि सहज पचते. गाईच्या दुधात A2 प्रोटीन असते, ते म्हशीच्या दुधात नसते. गाईच्या तूपात प्रथिने, खनिजे, कॅल्शियम, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच गाईचे तूप हृदयाला चांगले कार्य करण्यास मदत करते, तसेच रक्तातील धोकादायक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

दोन्ही प्रकारचे तूप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि त्यामध्ये समान प्रमाणात चरबी असते. म्हशीच्या तुपापेक्षा गाईचे तूप चांगले मानले जाते. गाईचे तूप श्रेयस्कर आहे कारण त्यात कॅरोटीन व्हिटॅमिन ए असते, ते डोळा आणि मेंदूच्या कार्यासाठी चांगले असते. तसेच हे तूप पचनासाठी चांगले असून त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे.

गाईच्या तुपापेक्षा म्हशीच्या दुधात जास्त फॅट आणि कॅलरीज असतात. तसेच सर्दी, खोकला आणि कफ आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. गाय किंवा म्हैस, कोणाच्या दुधापासून बनवलेले तूप जास्त आरोग्यदायी, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो. तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार कोणते तूप आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

या तुपात मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात आढळतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. याशिवाय तूपात असणारे पोषक घटक त्वचा, केस, मेंदू इत्यादींसाठी देखील खूप चांगले आहे. गाईचे तूप जास्त प्रमाणात वापरले जाते. या तुपाचा रंग पिवळसर असतो, जो आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतो. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात.

गाईच्या तुपात फॅटचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते. म्हशीचे तूप पांढरे असते. गाईच्या तूपाच्या तुलनेत म्हशीच्या तूपाचे आरोग्यासाठी कमी फायदे आहेत. म्हशीच्या तुपात फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी म्हशीचे तूप खाऊ नये.

which ghee is better for health buffalo or cow


Previous Post

काय सांगता! आमदार विसरला चक्क स्वतःच्याच लग्नात जायला; पुढं काय झालं?

Next Post

दिल्लीतील मृतदेहाच्या तुकड्यांचे गूढ कायम सीसीटीव्हीतून मिळाला महत्त्वाचा पुरावा

Next Post
प्रातिनिधिक फोटो

दिल्लीतील मृतदेहाच्या तुकड्यांचे गूढ कायम सीसीटीव्हीतून मिळाला महत्त्वाचा पुरावा

ताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.