बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यंदा दसरा नक्की कधी आहे? ४ ऑक्टोबर की ५ ऑक्टोबर? जाणून घ्या सविस्तर

by Gautam Sancheti
सप्टेंबर 22, 2022 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
Dasara Vijayadashmi

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव त्याचप्रमाणे दसरा आणि दिवाळी हे सण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा.. ‘असे म्हटले जाते. दृष्ट आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. याच दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. याच विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. नवरात्राची सांगताही याच तिथीला दुर्गा विसर्जनाने केली जाते. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, अशीही आख्यायिका आढळून येते. आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा केला जातो. दिवाळीच्या २० दिवस आधी दसरा येतो. यंदा बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होणार आहे. याआधी अश्विन नवरात्र येते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला विजयादशमी साजरी केली जाईल. यावेळी अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२० वाजेपासून सुरू होईल. दशमी तिथीची समाप्ती बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी २.१३ ते ३ वाजे पर्यंत आहे.

भगवान श्रीरामांनी दसर्‍याच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी आयुध म्हणजे शस्त्राची पूजा केली जाते. तसेच विद्याचीसुद्धा पूजा केली जाते. यादिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात.

दरवर्षी विजयादशमीला आयुधा पूजा केली जाते. देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण प्रत्येक व्यक्तीला वाईटावर चांगल्याच्या विजयाची शिकवण देतो.या वर्षी दसरा हा सण बुधवार, ५ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी रावण आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे ठिकठिकाणी दहन केले जाते. शास्त्रात या दिवशी शस्त्र आणि शस्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

वैदिक पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२१ पासून सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे उदय तिथीला आधार मानून दसरा केवळ ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्याचबरोबर विजय, अमृत काल आणि मुहूर्त असे शुभ योगही या दिवशी तयार होत आहेत. ज्याचे विशेष महत्त्व ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. या योगांमध्ये उपाय सिद्ध होतात.

शास्त्रानुसार विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीचे पूजन करावयाचे. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पूजन करायचे, अशी प्रथा प्रचलित आहे. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे.

When Dasara Festival Will Be Celebrated
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अपघातात मृताचे साेने झाले होते गहाळ; पोलीसांचा बनाव असा झाला उघड, न्यायालयाने दिले हे निर्देश

Next Post

…म्हणून वाहनांचे टायर काळ्या रंगाचेच असतात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

...म्हणून वाहनांचे टायर काळ्या रंगाचेच असतात

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011