इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, गणेशोत्सव असो की नवरात्रोत्सव त्याचप्रमाणे दसरा आणि दिवाळी हे सण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा.. ‘असे म्हटले जाते. दृष्ट आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. याच दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. याच विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. नवरात्राची सांगताही याच तिथीला दुर्गा विसर्जनाने केली जाते. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले, अशीही आख्यायिका आढळून येते. आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे.
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा केला जातो. दिवाळीच्या २० दिवस आधी दसरा येतो. यंदा बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होणार आहे. याआधी अश्विन नवरात्र येते. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला विजयादशमी साजरी केली जाईल. यावेळी अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२० वाजेपासून सुरू होईल. दशमी तिथीची समाप्ती बुधवार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी २.१३ ते ३ वाजे पर्यंत आहे.
भगवान श्रीरामांनी दसर्याच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी आयुध म्हणजे शस्त्राची पूजा केली जाते. तसेच विद्याचीसुद्धा पूजा केली जाते. यादिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
दरवर्षी विजयादशमीला आयुधा पूजा केली जाते. देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण प्रत्येक व्यक्तीला वाईटावर चांगल्याच्या विजयाची शिकवण देतो.या वर्षी दसरा हा सण बुधवार, ५ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी रावण आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे ठिकठिकाणी दहन केले जाते. शास्त्रात या दिवशी शस्त्र आणि शस्त्रांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.
वैदिक पंचांगानुसार, या वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.२१ पासून सुरू होईल आणि दुसर्या दिवशी म्हणजे बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. त्यामुळे उदय तिथीला आधार मानून दसरा केवळ ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. त्याचबरोबर विजय, अमृत काल आणि मुहूर्त असे शुभ योगही या दिवशी तयार होत आहेत. ज्याचे विशेष महत्त्व ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. या योगांमध्ये उपाय सिद्ध होतात.
शास्त्रानुसार विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीचे पूजन करावयाचे. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पूजन करायचे, अशी प्रथा प्रचलित आहे. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतही प्रचलित आहे.
When Dasara Festival Will Be Celebrated
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD