पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमच्याबद्दल काय बोलत आहे, हे कोणाला जाणून घेण्याची इच्छा नसेल? याबद्दल तुम्हाला व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन मिळाले तर, किती चांगले होईल. व्हॉट्सअॅपने अशा प्रकारचे एक फिचर तयार केले आहे. मित्र परिवार किंवा नातेवाईक तुमच्याबद्दल बोलत असतील तर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर नोटिफिकेशन मिळेल अशा फिचरवर व्हॉट्सअॅपचे काम सुरू आहे.
नवे फिचर कोणते
व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही सहभागी असलेल्या ग्रुपमध्ये जेव्हा कधी तुमचा उल्लेख होईल, तेव्हा व्हॉट्सअॅप तुम्हाला चॅटमध्ये कोणी मेन्शन केले आहे याचे नोटिफिकेशन देणार आहे. तुमच्या नोटिफिकेशनमध्ये त्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटोही दिसेल. सध्या हे फिचर फक्त आयओएस बिटा टेस्टरमध्ये उपलब्ध आहे. नव्या वर्षात २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपचा पहिला मोठा रोलआउट असणार आहे. सध्या तुम्हाला कोणी चॅटमध्ये मेन्शन केले असेल, तर त्याचा फक्त टेक्स्ट अलर्ट मिळू शकतो. नवे फिचर टेस्टिंग मोडमध्ये आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपला नोटिफिकेशनमध्ये प्रोफाइल फोटो जोडण्यात काही समस्या येऊ शकतात.
आणखी एका फिचरवर काम सुरू
कंपनी आणखी एका फिचरवरही काम करत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये आता लास्ट सीन स्टेटस सर्व युजर्ससाठी हाइड होते. आता एका अपडेटच्या माध्यमातून यामध्ये बदल करण्याची तयारी व्हॉट्सअॅपकडून सुरू आहे. अपडेट आल्यानंतर युजर्स लास्ट सीन स्टेटस ज्यांच्यापासून लपवू इच्छितात, त्यांचे नंबर निवडू शकणार आहेत.