नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सुरू आहे. ३० जानेवारीला या उपक्रमाचा समारोप होणार आहे. या दिवशी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा फडकविण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लागलीच हात जोडो अभियान सुरू केले जाणार आहे. काँग्रेसचे महासचिव वेणूगोपाल आणि जयराम रमेश यांनी शनिवारीच नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात हात जोडो अभियान सुरू केले. यावेळी भारत सरकार विरोधात आरोपपत्रही जाहीर केले.
राहूल गांधी यांनी ७ सप्टेंबरला कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरू केली. ती २९ जानेवारीला श्रीनगर येथ येऊन थांबेल. दुसऱ्या दिवशी ३० जानेवारीला राहुल गांधी श्रीनगर येथील पक्षाच्या कार्यालयात कन्याकुमारीपासून सोबत असलेला तिरंगा फडकवतील. त्याचवेळी अन्य कार्यकर्ते लाल चौकासह देशात विविध ठिकाणी तिरंगा फडकविणार आहेत. हा उपक्रम संपताच नव्या अभियानाची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षाने मोदी सरकारला अपयशी सांगून घर घर पोहचण्यासाठी या नवीन अभियानाची तयारी सुरू केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात सहभाग
भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले नव्हते. मात्र, आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे त्यात राहुल सक्रीय होणार आहेत. तसेच, मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात प्रचारालाही राहुल जाणार आहेत. त्याशिवाय पक्षाच्या विविध बैठकांनाही ते उपस्थित राहणार आहेत.
हात जोडो अभियान २६ मार्चपर्यंत
भारत जोडो यात्रेचा संदेश घरा-घरात पोहचविण्यासाठी २६ जानेवारीपासून हात जोडो अभियान सुरू करण्यात येत आहे. सरकारच्या धोरणामुळे सामान्य लोकांचे नुकसान होत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहचले जाणार आहे. २६ मार्चपर्चंत हे आंदोलन सुरू राहील.
केंद्रावर निशाणा
यापार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्या ट्वीटर हँडलवरून भाजपच्या हुकुमशाहीविरोधात आरोपपत्र जारी केले आहे. त्यात भ्रष्ट पक्षाचा नारा, काहींचा साथ, स्वतःचा विकास, सगळ्यांसोबत विश्वासघात असा आहे. असा आरोप काँग्रेसने आरोपपत्रातून केला आहे. काँग्रेस नेते वेणूगोपाल यांनीही बेरोजगारीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. शिक्षण क्षेत्रात मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ८० टक्के तत्ज्ञांची कमतरता असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.
https://twitter.com/bharatjodo/status/1617114856477409280?s=20
What Next After Bharat Jodo Yatra Rahul Gandhi