इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याचे प्रकरण देशभरात गाजते आहे. ईडीकडून या भ्रष्टाचाराविषयी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये २० कोटी रुपये रोकड, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, संपत्तीसंदर्भातील करारपत्रे अशा अनेक गोष्टी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त केल्या आहेत. आतापर्यंत २९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1552528307878371328?s=20&t=GlFd0aYOYfh3JhD05xtgTQ
शिक्षक घोटाळ्याप्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराच्या माहितीवरुन चॅटर्जी आणि मुखर्जी यांच्या संपत्तीची तपासणी ईडीकडून घेतली जात आहे. एसएससी घोटाळा झाला तेव्हा सध्या ईडीने अटक केलेले मंत्री पार्थ चटर्जी शिक्षणमंत्री होते. कोलकात्याजवळच्या बेलघराई शहरातील घरावर केलेल्या छापेमारीमध्ये ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मागील आठवड्यामध्येच अर्पिता यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावरील छापेमारीमध्ये २० कोटी रोकड सापडली होती. या रकमेचा पंचनामा करण्यासाठी कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. तसेच या चौकशीत सापडलेल्या सोन्याच्या विटांची किंमत ही दोन कोटींहून अधिक आहे. तपासामध्ये अधिक संपत्ती सापडण्याची शक्यता ईडीकडून व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1552333747487674368?s=20&t=Eek-yO6fFjp9r_N7kzvr3A
अशाच प्रकारची छापेमारी बुधवारी अर्पिता यांच्या अन्य एका घरी करण्यात आली असताना तिथेही मोठी संपत्ती सापडली आहे. या छापेमारीमध्ये रोख रक्कमेबरोबरच सोनं आणि संपत्तीचे कागदपत्रंही आढळून आली. या नव्या छापेमारीनंतर भारतीय जनता पक्ष बंगालचे अध्यक्ष सुखांता मुजूमदार यांनी ट्विटरवरुन तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना, “हे केवळ हिमनगाचं टोक आहे,” असं म्हटलंय.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीमध्ये एकूण २९ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अर्पिता यांच्या घरांमधून जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य हे ४० कोटींहून अधिक आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सध्या पार्थ चटर्जी उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतरही ते राजीनामा देण्यास तयार नाहीत. या प्रकरणावरुन आता भाजपा नेते आक्रमक झाले असून ममता बॅनर्जी यांच्यासाठी हे प्रकरण अडचणीचं ठरु शकतं असं मत व्यक्त केलं जात आहे.
https://twitter.com/DrSukantaBJP/status/1552339750710784000?s=20&t=43OFUEGkILxswd9DJlp9Ig
West Bengal Arpita Mukherjee ED Raid Seized Money Gold