India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका; नगर परिषद निवडणुकीबाबत दिले हे महत्त्वाचे आदेश

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. राजकीय ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आऱक्षणाशिवायच होणार आहेत. या निवडणुकांची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाला त्याचे पालन करावे लागणार आहे. परिणामी, राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदांच्या आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या. त्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षमासह निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. मात्र, राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती करीत या नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार आयोगाने या निवडणुका स्थगित केल्या. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला फटकारले आहे. ९२ नगर परिषद आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुका या यापूर्वीच्या अधिसूचनेप्रमाणेच घ्याव्यात, असे न्यायालयाने बजावले आहे. परिणामी आयोगाकडून आता पुन्हा निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे.

Supreme Court Order Nagar Parishad election OBC Reservation


Previous Post

भन्नाटच! गुगल मॅप्सवर बघा आता चक्क ३६० अंशांमधील रस्ता; महाराष्ट्रातील या ४ शहरांचे रस्ते एकदा पहाच

Next Post

नोटाच नोटा.. सोन्याच्या विटा… करारपत्रे… अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडले आणखी एवढे मोठे घबाड (व्हिडिओ)

Next Post

नोटाच नोटा.. सोन्याच्या विटा... करारपत्रे... अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडले आणखी एवढे मोठे घबाड (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group