अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उझबेकिस्थानच्या ताश्कंद येथे झालेल्या वेटलिफ्टिंग युथ एशियन व मेक्सिको येथील जागतिक युथ स्पर्धेत भारताला अनुक्रमे कांस्य व सिल्व्हर पदकाची कमाई करून देणाऱ्या मनमाडच्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगपटू आकांक्षा किशोर व्यवहारे हिचे मायभूमी मनमाडमध्ये आगमन होताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. मनमाड रेल्वे स्थानकावर कुटुंबियांनी तिचे औक्षण करत स्वागत केले. यावेळी तिच्या आई – वडीलांसह कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. तिचे पाहिले प्रशिक्षक आकांक्षाचे काका आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रविण व्यवहारे यांनी तर अक्षरश तिला उचलुन घेत आनंद व्यक्त केला. शहरातील नागरिक व नगरपालिका कर्मचारी यांनी तिचे स्वागत केले.