इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑनलाइन ब्रोकरेज कंपनी झिरोधाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन फिटनेस चॅलेंज सादर केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक कामांची लांबलचक यादी समाविष्ट आहे. हे आव्हान पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ प्रोत्साहनच मिळणार नाही, तर एका भाग्यवान कर्मचाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीसही दिले जाणार आहे.
झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांच्या मते, या चॅलेंजमध्ये दररोज किमान ३५० कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. कंपनीच्या फिटनेस ट्रॅकर्सवर दैनंदिन ध्येय निश्चित करणे हा एक पर्याय असेल. कामत यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, “झिरोधाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी फिटनेस स्पर्धा आणली आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांना दैनंदिन टार्गेट देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणूनही दिला जाईल. शिवाय १० लाख रुपयांचे प्रोत्साहन बक्षिसही आम्ही जाहीर केले आहे.”
कामत यांनी दावा केला की, त्यांची कंपनी कर्मचार्यांना घरून काम करताना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. “आपल्यापैकी बहुतेक वर्क फ्रॉम होम करीत आहेत. आपण एक लक्षात घ्यायला हवे की, सतत बसणे हे एक प्रकारचे नवे धूम्रपानच आहे. त्यातून नवनीन समस्या निर्माण होत आहेत. आपण संघटीत काम करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे कुटुंब सतत पुढे जायला हवे.” झिरोधाच्या संस्थापकाने त्यांच्या या पोस्टसोबत आरोग्य अॅपचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला.
कामत यांनी लिहिले आहे की, “कोविडनंतर माझे वजन वाढले. आता ही ट्रॅकिंग अॅक्टिव्हिटी झाली आहे. तसेच आहाराबाबत अधिक जागरूक रहायला हवे. हळूहळू रोजचे लक्ष्य १ हजार कॅलरीजपर्यंत वाढवत जायचे आहे.” या वर्षी एप्रिलमध्ये, झिरोधाने आधीच कर्मचार्यांना वजन कमी करण्यास प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले होते. २५ पेक्षा कमी बीएमआय असलेल्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या महिन्याच्या पगाराइतका बोनस मिळाला आहे.
Weight Loss Company Offer Employee Win Prizes