साप्ताहिक राशिभविष्य – १४ ते २१ ऑगस्ट २०२२
मेष – या सप्ताहात मुख्यतः आपण ज्यांना वेळोवेळी मदत केली, धीर दिला अशी मंडळी त्याची जाणीव ठेवतीलच असे नाही. या पद्धतीचा अनुभव येऊ शकतो. अशावेळी नेकी कर और गंगा मे डाल ती म्हण लक्षात ठेवावी…..
वृषभ – गुंतवणुकीसाठी निवडलेले विविध पर्याय कसे योग्य होते, त्यांचा उपयोग या सप्ताहात होणार आहे. अशावेळी शक्यतो पुर्नगुंतवणूक करण्यासाठी पर्याय शोधावे…..
मिथुन – नोकरदार व्यक्तींसाठी हा सप्ताह थोडा अनुभवाचा राहू शकतो. आपण वेळोवेळी आऊट ऑफ जाऊन केलेली कामे याचे श्रेय वरिष्ठांकडून मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नये…..
कर्क – स्थावर मालमत्तेबाबतचे प्रश्न या सप्ताहात डोके वर काढू शकतात. स्थावर मालमत्तेबाबत केलेली गुंतवणूक याबाबत पुनर्विचार करावा लागू शकतो….
सिंह – या सप्ताहात विविध कारणाने मान अपमान नाट्य रंगेल, असे दिसतंय. पूर्वी आपल्याला आलेले परिचितांचे अनुभव या सप्ताहात निर्णय घ्यायला कमी येतील……
कन्या – परदेश गमन, परदेश प्रवास, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट, विदेशी शिक्षण या क्षेत्रातील मंडळींना या सप्ताहात विविध प्रकारच्या शुभ वार्ता मिळू शकतात…..
तूळ – जवळच्या मंडळींनी ऐनवेळी महत्त्वाच्या कामात केलेला अपेक्षाभंग आपणास मनाला चुटपुट लावून जाऊ शकतो. पुढील वेळेस जशास तसे राहावे…..
वृश्चिक – मोठा आर्थिक व्यवहार जवळच्या नातेवाईकांच्या साहाय्याने पार पडतील. एखादा राजकीय निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याच नातेवाईकांमध्ये कटूता येणे संभव आहे……
धनु – या सप्ताहात सामाजिक क्षेत्रात वावरताना सावधपणे मतप्रदर्शन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कामाबाबत गुणगौरव होईल……
मकर – वात प्रकोप, हाडांचे दुखणे वर डोके काढू शकते. सहज होईल अशा कामात अनपेक्षित दिरंगाई होण्याचा प्रसंग अगोदरच लक्षात घ्यावा…..
कुंभ – आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार आपल्या भविष्यकालीन महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू नये. त्या झाल्यावर आपोआप कळणारच असतात……
मीन – विविध प्रकारचे फायदेशीर बदल या सप्ताहात होऊ शकतात. त्यामध्ये नोकरीविषयक व्यवसायातील संकल्पना विषयक गुंतवणूक विषयक असू शकतात……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हॉट्सअप 9373913484