साप्ताहिक राशिभविष्य
४ ते ११ नोव्हेंबर २०२२
मेष – व्यवहार सुरळीत होतील. जुनी येणी मिळणे सुलभ होईल. गुंतागुंतीच्या व्यवहारांना चालना मिळेल. नवीन व्यवहार घडून येतील, असे अनुभव यावेळी येऊ शकतात……
वृषभ – नातेसंबंध परत जुळणे, नाती निर्माण होणे, सार्वजनिक संबंध वाढणे, वाद मिटणे, या काळात होईल……
मिथुन – मालमत्तेसंबंधातील व्यवहार पूर्ण होतील. उर्वरित प्रश्न मार्गी लागतील. स्थावर खरेदी विक्री व्यवहार पूर्ण होतील, असे अनुभव राहतील…..
कर्क – महत्त्वाच्या क्रीडा विषयक घडामोडी खेळाडूंना नवीन संधी मिळतील. विविध स्पर्धांमध्ये यश मिळेल, असे अनुभव राहतील…..
सिंह – आपल्या कार्याचा गौरव होईल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. त्याबद्दल आपले कौतुक होणे, असे अनुभव या सप्ताहात राहतील…..
कन्या – आपण दिलेला सल्ला योग्यरित्या अंमलात येईल. सल्ल्यानुसार वागल्यास फायदा होईल. सल्ला योग्यवेळी घेणे, हे उपयोगी ठरेल……
तूळ – व्यवहारिक निर्णय विचार करून घ्यावेत. महत्त्वाचे निर्णय या सप्ताहात घ्यावेत. फायदा तोटा विचार अवश्य करावा. केवळ होकार देऊ नये…..
वृश्चिक – व्यवसाय बदल संभवतो. या संबंधातील महत्त्वाच्या चर्चा, निर्णय या सप्ताहात होऊ शकतात. व्यवसाय तसाच ठेवून नवीन व्यवसायात सुरुवात होईल. व्यवसायाच्या शाखा काढणे असू शकते…..
धनु – उत्पन्नाचे स्रोत वाढवणे गरजेचे. या सप्ताहात ते शोधले जाऊ शकतात. चालू उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये भर पडेल…..
मकर – शुभ विधीसाठी तयारी होईल. आवश्यक साधनसामुग्री तसेच ठिकाण जमवण्यासाठी प्रयत्न असतील……
कुंभ – सहनशील राहू नये. प्रत्युत्तर योग्य शब्दात द्यावे. नातेसंबंध, परिचय यावर त्याचा परिणाम होऊ देऊ नये……
मीन – शैक्षणिक संधी सुरुवात होईल. नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे भविष्यकालीन योजना अमलात आणणे सोपे होईल……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84