साप्ताहिक राशिभविष्य – २० ते २७ नोव्हेंबर २०२२
मीन – केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. अशी गुंतवणूक वेगवेगळ्या पद्धतीने फायद्याची ठरेल. खर्चाला योग्य पर्याय नसल्यास पुर्नगुंतवणूक करावी …..
कुंभ – या सप्ताहात जुने कौटुंबिक अथवा सामाजिक वाद सांभाळणे आवश्यक आहे. हे वाद देण्याघेण्या संबंधात असू शकतात. अशावेळी तो व्यवहार पूर्ण करावा. म्हणजे पुढे त्रास होणार नाही…..
मकर – या सप्ताहात मुख्यतः महत्त्वाच्या कायदेशीर अडचणी अथवा जबाबदाऱ्या अचानक समोर येऊ शकतात. त्या पूर्ण करणे आवश्यक ठरू शकते. त्याकरता आर्थिक तयारी ठेवावी…..
धनु – प्रॉपर्टी मग ती व्यक्तिगत अथवा वडिलोपार्जित किंवा जमीन संदर्भात महत्त्वाची कामे या सप्ताहात पार पाडावी लागतील. महत्त्वाचे कागदपत्र व्यवस्थित फायलिंग करून ठेवावे….
वृश्चिक – पाठ, कंबरदुखी अथवा हाडांविषयी तक्रारी उद्भवू शकतात. त्याबाबत अंगावर दुखणे न काढता डॉक्टरकडून उपाय करावे……
तूळ – या सप्ताहात आपण दिलेला सल्ला आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. एखादा अनुभव या सप्ताहात येऊ नये, याची काळजी घ्यावी…..
कन्या – कुकिंग अथवा एखाद्या मेनू विषयक आपण दिलेली माहिती मोठ्या प्रमाणात खूप जणांना उपयुक्त ठरणार आहे. त्याकरता अजून नवीन मेनू प्रकार व त्याची रेसिपी तयार ठेवावी. …..
सिंह – दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती टाळावी. वेळीच वाद आटपून योग्य तो सुवर्णमध्य साधावा…..
कर्क – या सप्ताहात मोठा व अनेक दिवस मनात असलेला धार्मिक कार्य पार पडेल. शुभकार्य मार्गी लागेल. धार्मिक सप्ताह, दिंडीत सहभाग राहील…
मिथुन – नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे. घरातील ज्येष्ठांच्या मतानुसार काम करणे, सल्ला मानणे, नोकरी अथवा व्यवसायात वरिष्ठांची खप्पा मर्जी टाळणे. ही तारेवरची कसरत या सप्ताहात राहणार आहे……
वृषभ – नवीन प्लॉट-वास्तू विषयक व्यवहार या सप्ताहात होण्याची शक्यता आहे, तसे असेल तर वास्तू अथवा प्लॉटचे प्रवेशद्वार दक्षिण पश्चिम अथवा नैऋत्य भागात शक्यतो टाळावे …….
मेष – नवीन व्यवसाय सुरुवात, नवीन व्यवसायाची जागा निश्चिती, त्याबाबत करार अथवा योग्य ती कागदपत्रे करणे. एकूणच नवीन व्यवसाय संबंधित सर्व तयारी करणे. या सप्ताहात होऊ शकते…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.