इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विवाह लग्न सोहळा म्हणजे दोन जीवांचे मिलन होय. यामध्ये वधू आणि वर हे लग्न करतात, तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळ उपस्थित असतात. अर्थात लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा – परंपरा, पद्धती आहेत. कोणी वाजत गाजत धुमधडाक्यात लग्न करते. तर कोणी रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. अलीकडच्या काळात लग्नाच्या प्रथा – परंपरा आणि पद्धतीमध्ये देखील बदल झाले आहेत, त्यात एका जोडप्याचे चक्क पोलीस स्टेशन मध्ये लग्न पार पडले. बिहारच्या शिवहर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हा लग्न सोहळा पार पडला.
कुशहरमध्ये राहणाऱ्या प्रिया कुमारी आणि पहाडपूर गावातील सूरज कुमार हे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया आणि सूरज यांच्यात संभाषणाची सुरुवात राँग नंबरमुळे झाली. त्यानंतर ते दोघएही एकमेकांशी नियमित बोलू लागले. कालांतराने मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. या काळात ते दोघे एकमेकांना भेटायलाही लागले. यातच एक महिन्यापूर्वी या दोघांनी घरच्यांना न सांगता पुनौराधाम मंदिरात एकमेकांशी लग्नही उरकून घेतले. लग्न झाल्यानंतरही ते आपआपल्या घरातच राहत होते. कारण त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्नही धुमधडाक्यात, हॉलमध्ये लग्न न होता या दोन्ही नवदाम्पत्याने पोलीस स्टेशनमध्ये सप्तपदी घेतली.
दोघांच्या घरच्यांनी जेव्हा लग्नाला विरोध केला तेव्हा पोलीस ठाण्यातील इन्सपेक्टरने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या दोघांचे लग्न लावून दिले. हा सगळा प्रकार ही लग्नाची बाब काही दिवसांतच उघड झाली. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी प्रिया कुमारीला बाहेर जाण्यास मनाई केली. दोघांनीही जेव्हा आपआपल्या घरी लग्नाबाबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही घरातील कुटुंबीयांनी त्याला साफ नकार दिला. मात्र घरची मंडळी ऐकत नाहीत हे पाहिल्यानंतर हे दोघेही घरातून पळून गेले. त्यानंतर प्रिया कुमारीच्या घरच्यांनी मुलगी पळून गेल्याची तक्रर पोलीस ठाण्यात नोंदवली.
या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की या दोघांचा विवाह यापूर्वीच झालेला आहे. मुलीचीही मुलासोबत राहण्याची इच्छा आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय कुमार यादव यांनी दोन्ही घरातील कुचुंबीयांची समजूत काढली आणि पोलीस ठाण्यातच या दोघांचे लग्न लावून दिले. पोलीस इन्सपेक्टर यांनी मुलीच्या बाजूने तर स्थानिक लोकप्रतिनिधीने मुलाच्या बाजूने महत्त्वाची भूमिका निभावली. लग्नानंतर मुलगा मुलीला घेवून त्याच्या घरी गेला. आता सगळ्या जिल्ह्यात या आगळ्यावेगळ्या प्रेमाची आणि लग्नाची चर्चा सुरू आहे आहे.
Wedding Ceremony in Police Station Different Love Story
Bihar
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/