रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वर्ध्याची लीनता वाघमारे बनली महाराष्ट्राची पहिली महिला ड्रोन पायलट

by India Darpan
सप्टेंबर 9, 2023 | 5:03 am
in संमिश्र वार्ता
0
DSC 1459

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेती व्यवसायात आता नवनवीन बदल घडवून आणले जात असून यात आता महिला देखील मागे नाहीत. कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ‘सलाम किसान’ या भारताच्या सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या डेटा-संचलित व शेतकऱ्यांच्या इत्यंभूत गरजांची काळजी वाहणाऱ्या कृषीमंचाने वर्धा जिल्ह्यातील लीनता शेळके वाघमारे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला ड्रोन पायलटला प्रशिक्षित केले आहे. लीनता यांना ड्रोन प्रशिक्षक कार्यक्रमामध्ये प्रवेश देऊन सलाम किसानने कृषीतंत्रज्ञानामध्ये लिंगनिरपेक्षतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे.

लीनता यांना ड्रोन प्रशिक्षक कार्यक्रमामध्ये प्रवेश देऊन सलाम किसानने कृषीतंत्रज्ञानामध्ये लिंगनिरपेक्षतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांना डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पाच दिवसांच्या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. लीनता यांचा दृढनिश्चय आणि उत्साह यांनी लिंगाधारित पारंपरिक अडथळ्यांना मोडीत काढले आहे व भविष्यातील शेतीसाठी एक अनुकरणीय उदाहरण सिद्ध केले आहे. त्यांचे हे यश ड्रोन पायलट बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या महिलांसाठी एक प्रेरणा आहेच, पण शेतीच्या भवितव्याला आकार देण्याच्या महिलांच्या क्षमतेचेही ते प्रतीक आहे.

सलाम किसानच्या संस्थापक आणि सीईओ धनश्री मनधानी म्हणाल्या, “आम्ही महिलांना औपचारिक कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या दिशेनेही सातत्याने काम करत आलो आहोत. आमच्या शेकडो फील्ड ऑफिसर्समधून लीनता या परिवर्तनाची ज्योत म्हणून पुढे आल्या. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये एक फील्ड ऑफिसर म्हणून काम करण्यापासून सुरुवात करत आज त्या महाराष्ट्राच्या पहिल्या ड्रोन पायलट बनल्या आहेत. माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि हा प्रवास त्यांच्या सोबत करण्यास उत्सुक आहे. भारत सरकारही त्यांच्या आगामी योजनांमुळे अशाचप्रकारचे उपक्रम हाती घेत आहे, जिथे १५ हजार महिला स्वमदत गटांना शेतीसाठीचे ड्रोन्स पुरविले जाणार आहेत, ही बाबही हुरुप वाढविणारी आहे.”

लीनता शेळके वाघमारे म्हणाल्या, “शेतकऱ्याच्या कुटुंबातच लहानाची मोठी झाल्याने मला नेहमीच शेतीमध्ये रस होता. जेव्हा मी सलाम किसानशी जोडले गेले तेव्हा धनश्री मॅमनी मला स्वत:ला अधिक कौशल्यांनी सुसज्ज होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या एक मोठी कंपनी चालवित असतानाच शेतीच्या कामांचे आधुनिकीकरण करत आहेत या गोष्टीपासून मला प्रेरणा मिळाली. त्यांच्या पाठिंब्याने मी हे विस्तृत प्रशिक्षण पूर्ण केले आणि ड्रोन उडवायला शिकले. हे एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे आणि आता मी शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत करू शकते. मी देशाच्या कृषीक्षेत्राला आपले योगदान देत आहे, याचा मला आनंद आहे.”

Wardha Linta Waghmare Maharashtra First Women Drone Pilot

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

भारत – एक दर्शन… चिरंतन हिंदुधर्म

Next Post
bharatmata

भारत - एक दर्शन... चिरंतन हिंदुधर्म

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011