इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण झाली नसल्याची माहिती कारागृह अधीक्षक अधिका-याने पत्र काढून दिली आहे. कारागृहात सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये किरकोळ झटपट झाली. सोमवारी नऊ वाजता ही घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती अधीक्षक बिएन मुलानी यांनी दिली.
दरम्यान महादेव गिते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड कारागृहातून हर्सूल कारागृहात हलवण्यात आले आहे. वाल्मिक कारडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण झाली असल्याचे महादेव गिते यांनी सांगितले. कारागृहातील सीसीटीव्ही तपासा, यामागची खरी परिस्थिती समोर येईल असेही त्यांनी सांगितले.
अशी माहिती आली होती समोर
महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघे वाल्मिक कराड यांच्या अंगवार धावून गेले. तेव्हा बाजुलाच असलेला सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केली. महादेव गिते व अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा त्यांना राग होता. त्यामुळे त्यांनी तो काटा आज तुरुंगात काढल्याचे सांगण्यात आले होते. पण, आता कारागृह प्रशासनाने ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे.