India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

श्री व्यंकटेश बालाजी ब्रह्मोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; सुदर्शन दिग्विजय रथ यात्राही निघणार

India Darpan by India Darpan
September 25, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री. व्यंकटेश बालाजी ब्रह्मोत्सवास उद्या सोमवार २६ सप्टेंबर २०२२ ,घटस्थापने च्या मुहूर्तावर सुरुवात होत आहे. सकाळी १० वा पुण्याहवाचन , घटस्थापना , श्रींची मंदिर परिक्रमा या कार्यक्रमांनी होईल. उद्या सिंह वाहनावर श्री आरुढ होतील.

सायंकाळी ६ वा. श्री.व्यंकटेश बालाजी मंदिर , कापड पेठ येथून सुदर्शन दिग्विजय रथ यात्रेस प्रारंभ होईल. फुले व दिव्यांनी सजवलेल्या रथात सुदर्शन विराजमान होईल. पारंपरिक मार्गाने रथ यात्रा ढोल ताशा व व्यंकटरमणा गोविंदा च्या गजरात मार्गस्थ होईल. बालाजी मंदिर, भांडी बाजार, गंगा पटांगण, दिल्ली दरवाजा, गुलालवाडी व्यायामशाळा, मधली होईल, बुधवार टेक, जुनी तंबटाळी, भद्रकाली मंदिर, हुंडीवाला गल्ली, पगडबंद गल्ली सराफ बाजार कापड पेठ येथून परत बालाजी मंदिर येथे संपन्न होईल. ठीक ठिकाणी भाविक तसेच विविध मांडळे रथाचे यथोचित स्वागत करतात. रथाची जागोजागी पुजा केली जाते. अनेक भाविक रथाच्या दर्शना नंतर आपला उपवास सोडतात.

रथाचे मानकरी श्री.व्यंकटेश बालाजी मंदिराचे महंत व पुजाधिकारी श्री.डॉ.रमेश बालाजीवाले हे असतात. नियोजन व संचलनाची जवाबदारी एड.श्री.हर्षवर्धन बालाजीवाले हे बघतात. रथाची धुरा श्री. विक्रम बालाजीवाले व ध्रुव बालाजीवाले हे सांभाळतात. श्री.राजेश नाशिककर मार्ग व्यवस्थापन सांभाळतात. गोसावी, देशपांडे, मूर्ति, जांदे, गरबे, केळकर तसेच अनेक परिवार रथ यात्रेच्या यशस्वीतेसाठी हाथभार लावतात. भाविकांनी मोठ्या संख्येने या रथयात्रेचे दर्शन घ्यावे.

Vyankatesh Balaji Brahmotsav Rath Yatra
Nashik Navratri Festival


Previous Post

कोरोनामुळे श्वसनाच्या समस्यांमध्ये अधिकच भर; निरोगी फुफ्फुसांवरही गंभीर परिणाम

Next Post

‘अमरावती हॉस्पिटल आग दुर्घटनेचा २४ तासात चौकशी अहवाल द्या’, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Next Post

'अमरावती हॉस्पिटल आग दुर्घटनेचा २४ तासात चौकशी अहवाल द्या', देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group